The DYSP knelt down to fulfill the wish of the little boy | Sarkarnama

लहानग्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी डीवायएसपींनी टेकले गुडघे 

डी. के. वळसे पाटील 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पोलिस म्हटलं की कठोरपणे कायदा राबविणारी खाकी वर्दी ठळकपणे नजरेसमोर येते. पण या खाकी वर्दीतही माणुसकी आणि प्रेमाचा ओलावा असतो. लॉकडाउनच्या काळात वर्दीतील माणुसकीचे वारंवार दर्शन झाले आहे. खाकी वर्दीतील हा प्रेमाचा ओलावा मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील साडेतीन वर्षांच्या हसन इरफान शेख या चिमुकल्याने अनुभवला. 

मंचर (जि. पुणे) : पोलिस म्हटलं की कठोरपणे कायदा राबविणारी खाकी वर्दी ठळकपणे नजरेसमोर येते. पण या खाकी वर्दीतही माणुसकी आणि प्रेमाचा ओलावा असतो. लॉकडाउनच्या काळात वर्दीतील माणुसकीचे वारंवार दर्शन झाले आहे. खाकी वर्दीतील हा प्रेमाचा ओलावा मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील साडेतीन वर्षांच्या हसन इरफान शेख या चिमुकल्याने अनुभवला. 

मुस्लिम बांधव दरवर्षी रमजानप्रमाणेच बकरी ईद हा सण अत्यंत जल्लोषात आणि आनंदात साजरा करतात. यंदा मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मंचर शहरात मोठ्या पोलिस बंदोबस्तात अगदी साधेपणाने बकरी ईद साजरी करण्यात आली. काही मोजक्‍या मुस्लिम बांधवांनी आपले मित्रमंडळी आणि नातेवाइकांना खास शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्यासाठी दावतचेही आयोजन करण्यात आले होते. 

खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे मंचर शहरात बंदोबस्ताची पाहणी करत होते. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने अनेक मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मंचर पोलिस ठाण्यात टोम्पे आल्यानंतर काही मुस्लिम बांधव त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यात हसन शेख या साडे तीन वर्षांच्या लहानग्याचाही समावेश होता. 

बकरी ईदच्या टोम्पे यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्यानंतर हसन याने ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला. पण, टोम्पे उभे असल्याने लहानग्या हसनचा हात त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता. हे टोम्पे यांच्या लक्षात आले. क्षणाचा ही विलंब न करता टोम्पे यांनी गुडघे टेकून हसन याच्या शुभेच्छाचा स्वीकार केला. त्या वेळी लहानग्या हसनच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. ते दृश्‍य पाहून उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरीकही भारावून गेले होते. 

एरव्ही पोलिस खात्याचा दबदबा आणि दरारा याचीच चर्चा अधिक प्रमाण होत असते. खाकी वर्दीतही माणुसकी, आपुलकी, माया असते. मात्र पोलिसांची कायम नकारात्मकता पुढे येत असते. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या सारख्या अधिकाऱ्यांनी खाकी वर्दीतील प्रेमाचा ओलावा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. 

हेही वाचा : भाजप आमदाराचा मुंबई पोलिसांवर पत्रातून प्रश्‍नांचा भडिमार 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येनंतर त्याला धमक्‍या आल्या होत्या का? सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का? त्यात कोण उपस्थित होते? त्याने सीमकार्ड का बदलली होती, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे अंधेरी (प.) येथील आमदार अमित साटम यांनी उपस्थित केले आहेत. 

या संदर्भात आमदार साटम यांनी "झोन नऊ' चे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना पत्र लिहून असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात या दिशेने तपास करून त्याचे निष्कर्ष जनतेसमोर मांडावेत, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख