पवारसाहेबांमुळे मी बिनविरोध नगरसेवक झालो...

पवारसाहेबांनी मोरेसाहेबांकडे सूचक पाहिले अन मी बिनविरोध नगरसेवक झालो.
पवारसाहेबांमुळे मी बिनविरोध नगरसेवक झालो...
संजोग पाटील12.jpg

पिंपरी : १९८७ ची घटना. त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती. कॉंग्रेस पक्ष होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता होती. प्रा. रामकृष्ण मोरे शहराचे नेते होते. शहराचे महापौर असलेले माझे वडील म्हणजे कै.भिकूजी वाघेरे-पाटील यांचे निधन झाले.

शरद पवारसाहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. ते पिंपरीत आमच्या घरी सांत्वनाला आले. त्यावेळी आईने त्यांना सांगितले मी नाही राजकारणात येणार. त्यामुळे निवडणुकीला उभी राहायचा प्रश्नच नाही. तुम्ही संजोगला उभं करा. त्याला नगरसेवक करा. यावर पवारसाहेबांनी मोरेसाहेबांकडे सूचक पाहिले अन मी बिनविरोध नगरसेवक झालो.

माझी राजकारणातील एंट्रीच थेट नगरसेवक व ती ही बिनविरोध अशी झाली. ही ह्रद्य आठवण पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितली.

कार्यकर्ते जपणारे, वाढविणारे आणि त्यांची जाण ठेवणारे एवढेच नाही, तर नाव व पदासकट त्यांची ओळख असलेले असे आमचे साहेब आहेत. त्यांच्यामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता राजकारणात नगरसेवक म्हणून आला. त्यांच्यामुळेच १९९५-९६ ला महापौर झालो. २००४ पर्यंत नगरसेवक राहिलो. आतापर्यंत साहेबांनीच विविध पदांवर संधी दिली, असे वाघेरे म्हणाले.

वडिलांशी साहेबांचे निकटचे सबंध होते. ते त्यांनी नंतरही आमच्या कुटुंबावर कायम ठेवले आहेत. माझ्यावर व माझ्या कुटुंबावरही साहेबांचा मोठा जिव्हाळा व प्रेम कायम राहिले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीची १९९९ला स्थापना झाली आणि मीच नव्हे, तर कै. मधुकर पवळे, विलास लांडे, शाम वाल्हेकर, महमंद पानसरे असा आमचा १३ जणांचा ग्रुपही साहेबांबरोबर बाहेर पडलो. नंतर राष्ट्रवादीतूनही लगेच मी नगरसेवक झालो. २००४ पर्यंत मी या पदावर होतो. आता पत्नी उषा ही त्या पदावर, तर मी पक्षाचा शहराध्यक्ष आहे.

शरद पवारांच्या सासूरवाडीचा असाही दबदबा ! 
सोमेश्वरनगर (पुणे) : चौधरवाडीत पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगल्या जमिनीत ज्वारी, तर माळाला कुसळे उगवायची. परंतु गावाने एकी केली आणि गावाच्या जावयाचे घर गाठले. जावयाने सहकारी पाणीपुरवठा योजनांची स्थापना करायला लावली आणि अजित पवारांमार्फत गावाला फारसा त्रास न होता तीन योजना कार्यान्वित केल्या. यामुळे शंभर टक्के जिराईत असणारे गाव आज साठ-सत्तर टक्के बागाईत झाले आहे. जिथे ज्वारीसुद्धा होत नव्हती, तिथे गेली 15 वर्ष ऊस पिकत आहे. चौधरवाडी (ता. बारामती) या गावचे जावई दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आहेत. चौधरवाडी हे भारताचे कसोटीपटू (स्व.) सदू शिंदे यांचे गाव. त्यांच्या कन्या प्रतिभा शिंदे यांचा शरद पवार यांच्याशी 1 ऑगस्ट 1967 रोजी विवाह झाला. या शिंदे कुटुंबापैकी दोन कुटुंब चौधरवाडीत आजही राहत आहेत. मुख्यमंत्री असलेल्या पवारांकडे 1990 मध्ये लोक गेले आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. त्यानंतर लगेचच चौधरवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in