प्रशासक बनण्याच्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नाला दत्तात्रेय भरणेंची टाचणी

ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदासाठी सर्वसामान्य व्यक्तींची शिफारस करण्याचे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे, त्यामुळे प्रशासक पदासाठी इच्छुक असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या स्वप्नाला भरणे यांनी एक प्रकारे टाचणी मारली आहे. त्यामुळे गावोगावच्या विशेषतः इंदापूर तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांची स्वप्ने भंग पावण्याची चिन्हे आहेत.
प्रशासक बनण्याच्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नाला दत्तात्रेय भरणेंची टाचणी
The dream of political activists to become administrators will remain unfulfilled

वालचंदनगर (जि. पुणे) : ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदासाठी सर्वसामान्य व्यक्तींची शिफारस करण्याचे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे, त्यामुळे प्रशासक पदासाठी इच्छुक असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या स्वप्नाला भरणे यांनी एक प्रकारे टाचणी मारली आहे. त्यामुळे गावोगावच्या विशेषतः इंदापूर तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांची स्वप्ने भंग पावण्याची चिन्हे आहेत. 

जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील १४ हजार ४२४ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्हातील ७५० तर इंदापूर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले गावपुढारी प्रशासक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यातील अनेक इच्छुकांनी नेत्यांचे उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहे. 

गावोगावी राजकीय पुढाऱ्यांची प्रशासक होण्यासाठी चढाओढ सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने फिल्डिंग लावत आहेत. अनेकांनी वरिष्ठ नेत्यांच्या शिफारसी घेऊन पक्ष कार्यालय गाठले असून प्रशासकपदी नेमण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे हट्ट धरला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्यातील इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भूमिका पुणे जिल्ह्यात महत्वाची ठरणार आहे. 

पुणे जिल्हातील आणि त्यातही इंदापूर तालुक्यातील प्रशासकांच्या नियुक्तीमध्ये भरणे यांचा शब्द चालणार आहे, त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांच्या घरासमोर प्रशासक होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पुढाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, भरणे यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गर्दी टाळण्याचे आवाहन कररून वैयक्तिक भेटीही टाळल्या आहेत. 

याबाबत दत्तात्रेय भरणे यांनी आवाहन केले आहे की, पिढ्यानपिढ्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले पुढारी, कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून सरपंच होण्याचा बहुमान मिळवता येतो. मात्र, गावातील राजकारणामध्ये सक्रिय नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तींना सध्याच्या काळात सरपंच पदापर्यंत पोचणे अशक्य होऊन बसले आहे. अशा व्यक्तींना प्रशासक म्हणून काम करण्याची संधी देण्याची गरज आहे. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीच सर्वसामान्य नागरिकांच्या नावाची शिफारस करण्याचे आवाहन केल्यामुळे इंदापूर तालुक्यातील प्रशासक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या स्वप्नाला टाचणी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सचिन सावंतांनी एकदा डोके तपासून घ्यावे : गिरीश महाजन 

जळगाव : ‘‘कॉंग्रेस पक्षातर्फे सचिन सावंत यांना एमएलसी हवी होती, ती न मिळाल्यामुळेच त्यांना फस्ट्रेशन आले आहे. त्यामुळेच ते अशी वक्तव्य करीत आहेत. त्यांचे डोके एकदा तपाण्याची गरज आहे,’’ अशी टीका राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. 

राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी बिल्डर व व्यवसायिकाकडून ५०० कोटी रुपये जमविल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. त्यावर माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, ज्यांना स्वत:चे घर, स्वत:ची माणसे सांभाळता येत नाहीत, ते एवढे मोठे विधान करतात. त्यांचे हे आरोप अत्यंत बेछूट आणि चुकीचे, निराधार आहेत. सावंत यांना कॉंग्रेसकडून एमएलसी मिळणार होती, पक्षाने ती न दिल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच ते आता अशी विधान करीत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in