पुण्यात आजी-माजी गटनेत्यांमध्ये हमरी तुमरी 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या समोरच जोरदार वाद झाला. तळजाई टेकडी येथील जागेवरील उद्यानासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा वाद झाला.
Dispute between Congress and NCP leaders in Pune
Dispute between Congress and NCP leaders in Pune

पुणे : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या समोरच जोरदार वाद झाला. तळजाई टेकडी येथील जागेवरील उद्यानासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा वाद झाला. एकमेकांच्या उखाळ्या-पाखळ्या काढण्यापासून सुरू झालेला हा वाद एकेरीवर जाऊन पोचला. तेव्हा मात्र आयुक्त गायकवाड यांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढचा प्रसंग टळला. 

तळजाई टेकडी येथील शंभर एकर जागेवर उद्यान उभारण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी पुणे महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालामुळे तळजाई येथील जागेवर उद्यान उभारण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. 

महापालिका आयुक्त गायकवाड यांच्याकडून या जागेसंदर्भात ता. 2 जुलै सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला काही खाते प्रमुखांसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना देखील बोलविण्यात आले होते. 

बैठकीत मूळ विषय बाजूलाच राहिला आणि या आजी-माजी गटनेत्यांमध्ये आयुक्तांसमोरच जुंपली. दोन्ही नेत्यांचे आवाज हळूहळू वाढू लागले. चर्चा हमरी-तुमरीवर आली. एवढेच नव्हे तर कोणत्याही क्षणी एकमेकांमध्ये झटापटी होती की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रकरण हाताबाहेर जाते आहे, हे लक्षात आल्यानंतर आयुक्त गायकवाड यांनी त्या दोघांमध्ये हस्तक्षेप केला. 

"मला तुमच्या स्थानिक राजकारणात रस नाही,' असे स्पष्ट करीत आयुक्त गायकवाड यांनी दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन्ही नेत्यांनी बैठकीतून उठून जाणे पसंत केले. त्यामुळे पुढचा वाद टळला. परंतु महापालिकेच्या वर्तुळात हा दिवसभर चर्चेचा विषय झाला होता. 


पृथ्वीराज बाबा, फडणवीस फक्त बोलले; पण अजित पवारांनी करून दाखविले

मुंबई : सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात   जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी, असा निर्णय आज विधान परिषद सभापतींच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य यंत्रणेचा उपयोग करुन पुढील शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरु करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनातील त्यांच्या दालनात सातारा वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसंदर्भात बैठक झाली.

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, वित्त, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.  साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. जानेवारी 2012 मध्ये साताऱ्यात 419 कोटी खर्चाचे शंभर खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 500 खाटांचे रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र, ते कागदोपत्रीच राहिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com