देवेंद्र फडणवीसांनी दिले अजितदादांना चहाचे निमंत्रण! 

एका मंचावर येणार म्हणजे कुस्ती करणार की गाणं म्हणणार?
देवेंद्र फडणवीसांनी दिले अजितदादांना चहाचे निमंत्रण! 
Devendra Fadnavis invites Ajit Dada for tea!

पुणे : "भामा-आसखेड जलवाहिनी लोकार्पण कार्यक्रमाची पुणेकरांना जेवढी उत्कंठा नव्हती, त्यापेक्षा जास्त उत्कंठा मीडियाला होती. गेली दोन दिवसांपासून एक तारखेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार. आता आम्ही एका मंचावर येणार म्हणजे कुस्ती करणार की गाणं म्हणणार? हे समजायलाच वाव नाही. दोन-तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर दादा, तुम्ही मला चहाला बोलवा किंवा नाही तर माझ्याकडे चहाला या,'' अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार-फडणवीस एकत्र येण्याच्या बातम्यांवर भाष्य केले. 

पुण्याच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 1 जानेवारी) करण्यात आले. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. 

ते म्हणाले की, "आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता शहरातील काही भागात जाणवत होती. पण, भामा आसखेड योजनेमुळे ती आता दूर होणार आहे. सुमारे 14 लाख जनतेला पुरेल एवढे पाणी भामा आसखेड योजनेच्या माध्यमातून शहरात पोचले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे महापलिकेने पुणेकरांना ही भेट दिली आहे. त्याबद्दल मी महापलिकेचे अभिनंदन करतो. लोकहिताच्या कामांसाठी एकत्र येण्याची आपली परंपरा आहे, त्यानुसार पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमास अजितदादा आणि मी एकत्र आलो आहे.'' 

अजित पवार यांनी एकत्र येण्याच्या बातम्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, "नवीन बातम्या दाखवायला नाही मिळाल्या की अशा बातम्यांना जोर येतो. मीही गेली दोन-तीन दिवस बघत होतो. सारखे तेच तेच. अजित पवार-देवेंद्र फडणवीस एकत्र येणार. देवेंद्र फडणवीस यांचे मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून स्वागत करतो. मी आणि चंद्रकांतदादा आम्ही दोघे पुणे जिल्ह्यातलेच आहोत.'' 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in