महाविकास आघाडी सरकार म्हणजे, दोघांच्या कोचवर तिघे...

तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार तीन दिशांना चालले आहे. दोघांच्या कोचवर तिघे बसल्यासारखी या सरकारची अवस्था आहे.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे, दोघांच्या कोचवर तिघे...
Devendra Fadanvis slams maharashtra government over adhiwasi issuse

पिंपरी : तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार तीन दिशांना चालले आहे. दोघांच्या कोचवर तिघे बसल्यासारखी या सरकारची अवस्था झाली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन पक्ष ठरल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

भोसरी येथे भाजपच्या प्रदेश अनूसुचित जनजाती मोर्चाच्या पदाधिकारी बैठकीत फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. बैठकीमध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची आणि त्यांच्या जयंतीदिनी सुट्टी देण्याचा ठराव मंजूर केला गेला. पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे यांच्यासह देशाच्या विविध भागातून आलेले आदिवासी खासदार, आमदार, पदाधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीचा समारोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला.

आदीवासी हे हिंदू असल्याचे या मेळाव्यात ठासून सांगण्यात आले. तसेच आगामी जनगणनेत हिंदू असल्याचे आदीवासींनी सांगावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. भगवान शंकर आणि बजरंगबली हे आदीवासी होते, असा दावा यावेळी करण्यात आला.

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आल्यानंतर आदिवासींच्या योजना ठप्प झाल्या असून तिघांच्या भांडणात आदीवासींना एका पैशाचीही मदत मिळालेली नाही. याविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा इशारा त्यांनी दिला.

पेसा कायदा, आदिवासींवरील खावटी कर्जमुक्ती, आदिवासी आश्रमशाळा सुधारणा, मुलांना शहरातील नामांकिंत शाळेत शिक्षण अशा योजना आपल्या काळात सुरू झाल्या. या सरकारच्या काळात मात्र आदिवासींच्या सर्व योजना ठप्प झाल्याचे फडणवीस म्हणाले. आदिवासींच्या खात्यात चार हजार जमा करण्यापेक्षा त्या रकमेची खरेदी करून ती देऊन त्यात हात मारण्याचा या सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

तीन पक्षांचे हे सरकार तीन दिशांना चालले असून दोन माणसांच्या कोचवर ते तिघेजण बसले आहेत, असा टोला त्यांनी मारला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत सत्ता आली असून या तीन पक्षांची मिळूनही तेवढी ती नसल्याचा पूनरुच्चार त्यांनी केला. तरीही ते खोटा दावा करीत आहेत. मात्र, राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

Edited By Rajanand More 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in