पुण्याच्या उपमहापौरांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना कोरोनाची लागण झाल्याची चुकीची माहिती पसरविल्याने शेंडगे या माध्यमांवर संतापल्या आहेत. माध्यमांनी खातरजमा न करता बातम्या दिल्याने पुणेकरांसमोर चुकीची माहिती पोचली असून माध्यमांनी माफी मागावी.
The deputy mayor of Pune was not infected with the corona
The deputy mayor of Pune was not infected with the corona

पुणे : पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना कोरोनाची लागण झाल्याची चुकीची माहिती पसरविल्याने शेंडगे या माध्यमांवर संतापल्या आहेत. माध्यमांनी खातरजमा न करता बातम्या दिल्याने पुणेकरांसमोर चुकीची माहिती पोचली असून माध्यमांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, काही नगरसेवक व विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याने पुण्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भांबावले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून या प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यातूनच उपमहापौरांविषयी चुकीची बातमी आली. ही बातमी ऐकून महापौर शेंडगे संतापल्या. माध्यमांनी दिलेली चुकीची बातमी ऐकून अनेकांनी काळजीपोटी मला फोन केले. माध्यमांच्या प्रतिधिनींनी खातरजमा करून बातमी दिली असती तर हा गोंधळ उडाला नसता, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

त्या म्हणाल्या, "सकाळपासून मी माझ्या कामात आहे. मला कोरोनाची लागण झाल्याची माहिती माध्यमांना कुणी आणि कशी दिली, याची माहिती नाही. मात्र, या बातमीने गोंधळ उडाला आहे. कोरोनाचा मुकाबला करताना सारी यंत्रणा व्यस्त असताना अशा चुकीच्या बातमीने गोंधळात आणखी भर पडते. त्यामुळे माध्यमांनी माफी मागण्याबरोबरच माहितीची खातरजमा केल्यानंतरच बातम्या द्याव्यात.' 

दरम्यान, पुण्यात रोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे महापालिकच्या यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णालयात दाखल करण्यासाठी खाटांची अडचण आहे. प्रत्येक ठिकाणी बेड शिल्लक नाहीत, असे सांगण्यात येत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे महापालिकेकडे पुरेसे डॉक्‍टर व नर्सेसची कमतरता आहे. महापालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सारे वातावरण बदलले आहे.

कोरानाची लागण झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने इतर अनेक पदाधिकारी व नगरसेवक घरातच क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे नेहमी गर्दीचा असलेला महापालिका भवनाचा परिसर ओस पडला आहे. 
 

पुण्याच्या माजी महापौरांच्या कुटुंबांतील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह 

हडपसर (पुणे) : पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा कोरोना अहवाल आज (5 जुलै) सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. या नऊ जणांवर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार करण्यात येत आहेत. 

दरम्यान, नगरसेविका वैशाली बनकर आणि माजी नगरसेवक सुनील बनकर यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. सुनील बनकर यांची आई, चुलते व त्यांचा नातू, भाऊ, भावजय, चुलत भाऊ, चुलत भावजय, चुलत भाऊ व त्यांची नऊ वर्षांची मुलगी या 9 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com