आर. आर. पाटील लवकर गेले! आबांच्या आठवणींना अजितदादांकडून उजाळा

आर. आर. पाटील लवकर गेले असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक काळ बारा वर्षे गृहमंत्री राहिलेल्या आबांच्या आठवणींना आज उद्योगनगरीत उजाळा दिला.
आर. आर. पाटील लवकर गेले! आबांच्या आठवणींना अजितदादांकडून उजाळा
Deputy cm ajit pawar Brighten the memories of R R patil

पिंपरी : आर. आर. पाटील लवकर गेले असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक काळ बारा वर्षे गृहमंत्री राहिलेल्या आबांच्या आठवणींना आज उद्योगनगरीत उजाळा दिला. त्याला निमित्त ठरले, पिंपरी-चिंचवड शहरातून बदली झालेले आबांचे बंधू व सहाय्यक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांच्या सत्काराचे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलिस दल हायटेक करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्त पोलिस आय़ुक्तालयाच्या विविध अॅप्स आणि मिडिया पेजेस लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे व खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व्यासपीठावर होते. 

तडीपार गुंडाचे लोकेशन ट्रॅक करून शहरातील गुन्हेगारावर वॉच ठेवणाऱ्या एक्स ट्रॅकर या अॅपचे उदघाटन यावेळी दादांच्या हस्ते झाले. आबांचे बंधू राजाराम पाटील यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचा यावेळी अजितदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यानिमित्त त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. १२ वर्षे आबा गृहमंत्री असूनही त्यांचे बंधू राजाराम यांनी त्याचा कधी गैरफायदा घेतला नाही. दहा वर्षे त्यांनी साईडब्रॅंचला काम केले. आबांसारखेच ते ही सदग्रहस्थ आहेत, असे दादा म्हणाले.

पिंपरी-चिंचवडला माझं झुकतं माप असतं, असे यावेळी सांगताना उपमुख्यमंत्र्यांनी या शहरावर आपले किती प्रेम आहे, याचीच कबुली दिली. शहराचे सध्याचे पोलिस आयुक्तालय हे भाड्याच्या जागेत असल्याने चिखली येथे त्याला जागा दिली जाणार असून तेथे राज्यातील एक नंबरचे पोलिस आयुक्तालय करु, असे ते म्हणाले. कारण आपण कामे करतो, ती एक नंबरच करायचा प्रयत्न असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By Rajanand More
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in