अधिकाऱ्यांनो, कटू निर्णय घेण्यास भाग पाडू नका : अजित पवार 

पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर करावी. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
अधिकाऱ्यांनो, कटू निर्णय घेण्यास भाग पाडू नका : अजित पवार 
Deputy Chief Minister Ajit Pawar warns officers

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर करावी. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. 

दरम्यान, कोरोना संबंधित या निर्णयाची कार्यवाही न झाल्यास कटू निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी (3 जुलै) दिला. 

कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलनाची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, की राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारखान्यातील कामगारांची गैरसोय होऊ नये, यासाठी कारखान्यांच्या मालकांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारीरिक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

काही रुग्णालयांमध्ये डॉक्‍टर कोविड कक्षात जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत, अशा डॉक्‍टरांवर कारवाई करावी. 
कोविडच्या रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करीत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोरोनाचा संगर्स होत होत आहे.

ग्रामीण भागातील विविध समित्यांच्या सहकार्याने कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी योजना तयार करावी. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. 

पुणे विभागातील सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करावी. 

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्‍यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्यावी. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करा. कोरोनाबाधित रुग्ण तत्काळ शोधण्यासाठी आरोग्य चाचण्यांचे प्रमाण वाढवा. त्यांचे तपासणी अहवाल लवकर प्राप्त करावेत, जेणेकरुन सामूहिक संसर्ग पसरणार नाही. एखादा बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करावी, अशा सूचना मेहता यांनी केल्या. 

कोरोनाच्या चाचण्या वेळेत होण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात समन्वय साधण्यासाठी 'टेस्टींग इन्चार्ज' म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना मेहता यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in