अजितदादांनी सारथीबाबत घेतलेल्या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत - The decision taken by Ajit Dada regarding Sarathi is welcomed by the Maratha community | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

अजितदादांनी सारथीबाबत घेतलेल्या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत

महेश जगताप 
गुरुवार, 9 जुलै 2020

गेल्या काही दिवसांपासून सारथी या संस्थेला निधी न देण्यावरून महाविकास आघाडीवर टीका होत असतानाच सारथी ही संस्था बंद पडणार का काय? इथपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागेल तो निधी संस्थेला देऊ व आम्हाला ही संस्था टिकवायची आहे, असे म्हणत सात कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपयांचा निधी सारथी संस्थेला आज (ता. 9 जुलै) तडकाफडकी सुपूर्त करण्याचा आदेश काढला.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सारथी या संस्थेला निधी न देण्यावरून महाविकास आघाडीवर टीका होत असतानाच सारथी ही संस्था बंद पडणार का काय? इथपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागेल तो निधी संस्थेला देऊ व आम्हाला ही संस्था टिकवायची आहे, असे म्हणत सात कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपयांचा निधी सारथी संस्थेला आज (ता. 9 जुलै) तडकाफडकी सुपूर्त करण्याचा आदेश काढला. यावर मराठा समाजासाठी चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत आठ कोटी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत म्हणजे साडेतीनच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पत्र पाठविण्यात आले आहे. त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये निधी "सारथी' या संस्थेला तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना अजित पवार यांनी घेतलेला स्वागतार्ह आहे. ही संस्था टिकली पाहिजे. वाढली पाहिजे तरच या समाजातील तरुणांच्या प्रगतीला हातभार लागेल. पवार यांनी या संस्थेच्या दशकभरासाठीचे नियोजन आखून अंमलबजावणी केली पाहिजे. तरच संस्था मराठा समाजातील तरुणांसाठी एक मैलाचा दगड ठरेल. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण, अजित पवार यांनी संस्थेला आठ कोटी रुपये देऊन चोख उत्तर दिले आहे, असे मत व्यक्त केले. 

इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनीही ही संस्था जे स्वप्न शाहूमहाराजांनी मराठा समाजाच्या तरुणांबद्दल पाहिलं होतं, ते पूर्ण करील. त्यांचा विचार पुढे चालवेल. बार्टीच्या धर्तीवरच ही संस्था अतिशय पारदर्शक कारभार करेल, या संस्थेला महाविकास आघाडीने ताकद दिली, तरच ही संस्था ताकदीने काम करू शकेल, अशी आशा व्यक्त केली. 

यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या मुलांना संस्थेच्या वतीने आर्थिक मदत झाली, तर या देशाला सक्षम अधिकारी मिळतील. राष्ट्राच्या सेवेसाठी महाराष्ट्राचे योगदान फार मोठे आहे. तळागाळातील मराठा व कुणबी समाजाच्या मुलांच्या उन्नतीसाठी सरकारने सारथी संस्थेला भरभरून द्यावे. सारथी संस्था ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा कृती आणि विचारांचा जिवंत ठेवा आहे. सारथी संस्था सुरळीत चालावी, यासाठी संभाजी ब्रिगेडनेसुद्धा फार मोठा संघर्ष केला आहे. त्याला आज राज्य सरकारने मदत करून एक पाऊल पुढे टाकले आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख