पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासकांबाबत ठरलं : महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना संधी 

मुदत संपलेल्या पुणे जिल्ह्यातील सुमारे 750 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून संधी देण्याचे स्पष्ट आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.
Decision regarding Gram Panchayat Administrator in Pune District: Opportunity for all three parties in Mahavikas Aghadi
Decision regarding Gram Panchayat Administrator in Pune District: Opportunity for all three parties in Mahavikas Aghadi

शिक्रापूर (जि. पुणे) : मुदत संपलेल्या पुणे जिल्ह्यातील सुमारे 750 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून संधी देण्याचे स्पष्ट आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके या दोघांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. पुढील दहा दिवसांत अंतिम 750 जणांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे दोघांनी सांगितले. 

या निर्णयानुसार, ग्रामपंचायतीत ज्या पक्षाचे सरपंच आहेत, त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याच पक्षाचा प्रशासक नेमला जाणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा सरपंच आहे, त्या ठिकाणी तीनही पक्षाचे पदाधिकारी मिळून महाआघाडी सरकारमधील एका पक्षाचा व्यक्ती प्रशासक नेमला जाणार आहे, असे जिल्हाध्यक्ष कटके व गारटकर यांनी सांगितले. 

याबाबत तीनही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सर्व तालुकाध्यक्षांना तालुकानिहाय यादी बनविण्याची सूचना करण्यात आली आहे. या सर्व याद्या जिल्हाध्यक्ष संकलीत करणार असून त्यावर स्थानिक आमदार, खासदार (महाआघाडीचे) यांच्या शिफारशी जोडून अंतिम यादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाआघाडीचे सर्व प्रमुख नेते मिळून हे सर्व 750 प्रशासक जाहीर करणार आहेत. 

राज्यपालांनी 24 जून रोजी एका परिपत्रकाद्वारे राज्यातील 19 जिल्ह्यांतील मुदत संपलेल्या 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत. यात पुणे जिल्ह्यातील खेड (91), शिरुर (73), हवेली (55), आंबेगाव (30), बारामती (49), भोर (74), दौंड (50), इंदापूर (61), जुन्नर (67), मावळ (58), मुळशी (45), पुरंदर (66), वेल्हे (31) आदी तालुक्‍यांतील एकूण 1407 ग्रामपंचायतींपैकी 750 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम चालू महिन्यात होणे अपेक्षित होते.

या सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात संबंधित गावांचे नकाशे अंतिम करणे, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीने प्रभाग निश्‍चित करणे, सीमा निश्‍चित करणे, अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण निश्‍चित करणे, तहसीलदारांकडून या सर्व रचनेला मान्यता घेणे, आदी प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. 

दरम्यान, निकष स्पष्ट नसल्याने याबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र, ही बाब राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून महाआघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेतला. 


अशी असेल प्रशासक नियुक्ती प्रक्रिया 

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार संजय जगताप यांनाही याबाबत सूचना मिळाल्याची माहिती वरील दोघांनी दिली. त्या प्रमाणे तीनही जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांतील आपापल्या तालुकाध्यक्षांना पक्षनिहाय सरपंचांची यादी बनवायला सांगितली आहे. पुढील दोन दिवसांत तालुकानिहाय याद्या बनवून त्यावर पुन्हा तीनही जिल्हाध्यक्ष एकत्र बसून अंतिम 750 प्रशासकांची यादी तयार करणार आहेत. ती यादी पालकमंत्री अजित पवारांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून ती यादी अंतिम करणार आहेत. आगामी दहा दिवसांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार ही यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करुन या यादीप्रमाणे प्रशासक नियुक्तीची प्रशासकीय कार्यवाही होणार असल्याचे गारटकर व कटके यांनी सांगितले. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com