पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पोलिस निरीक्षकांना कोरोना 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा कोरोना अहवाल आज (ता. 29 जून) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपरी पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
Corona to two police inspectors in Pimpri-Chinchwad
Corona to two police inspectors in Pimpri-Chinchwad

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा कोरोना अहवाल आज (ता. 29 जून) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपरी पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोना विषाणूने सुमारे महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 

आयुक्तालयातील दोन पोलिस निरीक्षकांचा अहवाल सोमवारी (29 जून) पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आतापर्यंत सतरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील चौदा जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेले बहुतांश पोलिस संपूर्ण उपचारानंतर ड्यूटीवर हजर झाले आहेत. आयुक्तालयातील चार पोलिसांवर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त 

सोलापूर : सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील 93 वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत. 

घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर....दुसरी मुलगी कर्णबधीर... अशा परिस्थितीत 93 वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती. 

भाऊ मृत झाल्याने तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब 13 जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे. 

आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. याठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिलं जात होत. रोज डॉक्‍टर तपासणी आणि रूग्णांची विचारपूस करून जात असत. डॉक्‍टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होत आहे. आजीबाई कोरोनाला धीराने तोंड देत होत्या. 14 दिवस डॉक्‍टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर शनिवारी (27 जुलैला) आजीबाई कोरोनामुक्त होऊन घरी आल्या आहेत. मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. 

दुपारी आयुर्वेदिक काढा आणि काही औषध दिली जात होती, यामुळे मला आजारी असल्याचे जाणवलेच नाही. दोन वेळा जेवण करून निवांत झोप घेत होते. घरातल्यापेक्षा चांगली सोय झाली होती, फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटायचं कोंडून असल्याने ओळखीची लोकं बोलायला नसायचे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com