इंदापूरकरांना दिलासा ः पंधरापैकी 14 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

इंदापूर तालुक्‍यातील पोंदकुलवाडी परिसरात मुंबईहून परतलेल्या मायलेकांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या एकूण 15 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 14 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे.
Corona report of 14 out of 15 persons in Indapur is negative
Corona report of 14 out of 15 persons in Indapur is negative

इंदापूर ः इंदापूर तालुक्‍यातील बिजवडी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत पोंदकुलवाडी परिसरात मुंबईहून परतलेल्या मायलेकांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या एकूण 15 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 14 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. त्यामुळे इंदापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पळसदेव येथील 11 जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल 25 मे रोजी मिळणार असल्याचे सोनाली मेटकरी यांनी सांगितले. 

तालुक्‍यात 28 एप्रिल रोजी भिगवण स्टेशन परिसरात एका 63 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रीन झोन मध्ये असलेला इंदापूर तालुका रेड झोनमध्ये आला आहे.

त्यानंतर 16 मे रोजी मुंबईहून तालुक्‍यातील शिरसोडी या मूळ गावी परतलेल्या मायलेकींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या या दोघींवर इंदापूर येथे उपचार सुरू आहेत. यानंतर एक आठवड्याच्या आतमध्ये म्हणजे 22 मे रोजी पोंदकुलवाडी परिसरात मुंबईवरून परतलेल्या मायलेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यात एकच खळबळ उडाली. 

या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ इंदापूरजवळील डॉ. कदम गुरुकुल या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही रुग्ण किती जणांच्या संपर्कात आले, याचा तपास इंदापूर प्रशासनाकडून करण्यात आला. संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच दिवशी त्यांचे स्वॅबदेखील घेण्यात आले. त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून एकूण 15 व्यक्तींपैकी 14 व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असल्याचे मेटकरी यांनी सांगितले. 

माहिती न दिल्याने संकट गडद 

इंदापूर प्रशासनाने अत्यंत काळजी घेत कोरोनास तालुक्‍यापासून दूर ठेवले होते. भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर 48 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. हा अपवाद वगळता पाचपैकी चार रुग्ण मुंबई, तर एक रुग्ण पुण्यावरून इंदापूर तालुक्‍यात आले होता. मात्र त्यांची माहिती संबंधितांनी न दिल्याने कोरोनाचे संकट गडद झाल्याने इंदापूरकर हवालदिल झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com