धक्कादायक : पिंपरीत कोरोनाचे ४१ बळी, तीन दिवसांत १०५ जणांचा मृत्यू - Corona Cases rises in pimpri chinchwad gives alert to peoples | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

धक्कादायक : पिंपरीत कोरोनाचे ४१ बळी, तीन दिवसांत १०५ जणांचा मृत्यू

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे.

पिंपरी : कोरोनाचा हाहाकार पिंपरी चिंचवडमध्ये सुरुच असून आज एकाच दिवशी ४१ जणांचा बळी गेला आहे. दुसऱ्या लाटेतील हे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यु आहेत. मागील तीन दिवसांत कोरोनाने तब्बल १०५ जणांचा मृत्य एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचे सावट अधिक गडद होत चालले आहे.

पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. दररोज कोरोना रुग्णांचे आकडे नवीन विक्रम करत आहेत. आज शहरात दोन हजाराच्या घरात (१८३८) नवे कोरोना रुग्ण आढळले.काल २१८८ तर परवा २४०९  दोन हजारावर हे रुग्ण मिळून आले होते. 

गेल्या तीन दिवसांत दररोजच्या रुग्णसंख्येत किंचित घट दिसत असली, तरी मृत्यु मात्र वाढले आहेत. परवा (ता ११) ३० बळी गेले होते. काल (ता १२) त्यात आणखी चारची भर पडली. तर,आज हा आकडा ४१ वर गेला. दरम्यान,कोरोना रुग्ण व बळी संख्येबाबत प्रशासनाचा आकड्यांचा खेळ सुरु आहे. गेल्या २४ तासात फक्त १२ मृत्यू झाले असून बाकीचे त्याअगोदरचे आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.त्यातून बळींबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे आणि खासगी रुग्णालयांवर त्यांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कडक नियम लागू करण्याबाबत आजच निर्णय घेतील, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची आहे. कोरोना रुग्ण कमी असते तर आपल्याला लॅाकडाऊन टाळता येईल. लोकांचे जीव वाचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही शेख म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री राज्यात कडक लॅाकडाऊन जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेत्यांसह विविध घटकांशी चर्चा करत आहेत. आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख