खंबाटकी घाटातील बोगद्याचे काम तातडीने पूर्ण करा ः अजित पवार 

कराड-तासगाव, सातारा-कोरेगाव-म्हसवड या रस्त्यासोबत खंबाटकी घाटातील बोगद्याचे काम त्वरित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ट्‌विट करून त्यांनी याबाबतची सूचना केली आहे.
खंबाटकी घाटातील बोगद्याचे काम तातडीने पूर्ण करा ः अजित पवार 
Complete the tunnel work in Khambhatki Ghat immediately: Ajit Pawar

पुणे ः "कराड-तासगाव, सातारा-कोरेगाव-म्हसवड या रस्त्यासोबत खंबाटकी घाटातील बोगद्याचे काम त्वरित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिली आहे. ट्‌विट करून त्यांनी याबाबतची सूचना केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या ट्‌विटला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत आपापल्या भागातील रस्त्यांची परिस्थिती कथन केली आहे. 

सातारा जिल्ह्यातील कराड-तासगाव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे. सातारा-कोरेगाव-म्हसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. याबाबत लोकांची कायम मागणी असते. या कामांसाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी देण्यात यावी. तसेच, खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाला केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी ट्‌विटमध्ये दिली आहे. 

त्यांनी केलेल्या ट्‌विटबाबत अनेकांनी समाधान व्यक्त करत त्या त्या भागातील रस्त्यांची परिस्थिती लोकांनी मांडली आहे. 

अजित पवार यांनी पुण्यात पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने एक बैठक घेतली होती. या बैठकीत रस्त्यांच्या कामाबद्दल चर्चा झाली. लोकांनी त्यांना ज्या रस्त्याच्या दुरवस्था किंवा अपूर्ण कामाची माहिती दिली होती. त्याबाबत पवार यांनी सूचना दिल्या आणि रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर व अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर या रस्त्यांच्या कामाचाही आढावा घेतला. माढा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. 

पुणे जिल्ह्याबाबत आढावा घेताना संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे. भूसंपादनातील त्रुटी दूर कराव्यात. तसेच, मिळालेला निधी खर्च करण्याबाबत त्यांनी सूचित केले. या वेळी चांदणी चौकातील रस्त्याचाही त्यांनी आढावा घेतला. 

पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू आहे. चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव येथे वाहतूक कोंडी होते. तसेच, पुणे-नगर रस्त्यावर वाघोली येथेही तशीच परिस्थिती उद्भवते. त्यामुळे या भागातून प्रवास करणारे प्रवासी, नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी तेथील रुंदीकरणाचे कामे हाती घ्यावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in