पिंपरी चिंचवडमधील बारा मार्गांवर मंगळवारपासून बससेवा 

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी परिसरातील कामगार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी "पीएमपी'च्या निगडी, भोसरी आणि पिंपरी डेपोमार्फत एकूण 12 मार्गांवर मंगळवारपासून (ता. 26) बससेवा सुरु करण्यात येणार आहे. मात्र, दहा वर्षांखालील आणि 65 वर्षांपुढील प्रवाशांना मनाई करण्यात आली असून प्रत्येक बसमध्ये मास्क असलेल्या केवळ 21 प्रवाशांनाच बसण्याची मुभा देण्यात आली आहे.
 Bus service from Tuesday on twelve routes in Pimpri Chinchwad
Bus service from Tuesday on twelve routes in Pimpri Chinchwad

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी परिसरातील कामगार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी "पीएमपी'च्या निगडी, भोसरी आणि पिंपरी डेपोमार्फत एकूण 12 मार्गांवर मंगळवारपासून (ता. 26) बससेवा सुरु करण्यात येणार आहे. मात्र, दहा वर्षांखालील आणि 65 वर्षांपुढील प्रवाशांना मनाई करण्यात आली असून प्रत्येक बसमध्ये मास्क असलेल्या केवळ 21 प्रवाशांनाच बसण्याची मुभा देण्यात आली आहे. 

पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, "पीएमपी' चालक- वाहक प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मार्गावरील बसेस दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून पाठविल्या जाणार आहेत.

डेपोव्यतिरिक्त बस स्थानकावर सॅनिटायझिंग पथकाची नेमणूक करुन बसेसची स्वच्छता केली जाणार आहे. नियंत्रक तथा तपासणीस (कंट्रोलर-चेकर) हे बसमध्ये 21 प्रवासी संख्येच्या मर्यादेचे पालन होत आहे अथवा नाही, याची खात्री करणार आहेत. चालक-वाहक यांनी नेमून दिलेल्या फेऱ्यांचे वेळा काटेकोरपणे पाळण्याच्या सूचनाही पीएमपी प्रशासनाने दिल्या आहेत. 

बसमार्ग क्रमांक आणि बस कोणत्या स्थानकपासून आणि कुठपर्यंत जाणार ते पुढील प्रमाणे ः 305 निगडी ते वडगाव/ नवलाख उंबरे, 306 डांगे चौक ते हिंजवडी-माण फेज 3, 330 आकुर्डी रेल्वे स्थानक ते चिखली, 340 निगडी ते चऱ्होली गाव /आळंदी, 343 वडगाव मावळ ते चाकण, आंबेठाण चौक, 350 निगडी ते देहूगाव, 367 निगडी ते भोसरी, 368 निगडी ते कामशेत, 369 निगडी ते चाकण /वासोली, 372 निगडी ते हिंजवडी-माण फेज 3, 381 चिखली ते हिंजवडी-माण फेज 3, 309 आळंदी ते देहूगाव,

324 बीआरटी भोसरी ते हिंजवडी-माण फेज 3, 345 बीआरटी भोसरी ते हिंजवडी-माण फेज 3, 351 आळंदी ते जांबे, 358 भोसरी ते राजगुरुनगर, 358 भोसरी ते चाकण, आंबेठाण चौक, 361 भोसरी ते आळंदी, 120 भोसरी ते म्हाळुंगे एमआयडीसी, 302 पिंपरी गाव ते भोसरी, 304 चिंचवड गाव ते भोसरी, 326 पिंपरी गाव ते चिखली, 327 हिंजवडी-माण फेज 3 ते आळंदी, 331 चऱ्होली गाव ते रहाटणी गाव मार्गे चऱ्होली फाटा, 331 भोसरी ते रहाटणी गाव, 335 डांगे चौक ते जांबे/ नेरे दत्तवाडी, 355 चिखली ते डांगे चौक, 362 वायसीएम हॉस्पिटल ते आळंदी, 380 भोसरी ते हिंजवडी-माण फेज 3, 313 चिंचवडगाव ते चांदखेड. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com