भाजप आमदार लाड यांच्याकडून ११० कोटींचा घोटाळा?   - BJP MLC Prasad lad involve in Smart City 110 cr Scham, Pune Politics | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार लाड यांच्याकडून ११० कोटींचा घोटाळा?  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबिय संचालक असलेल्या कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामात ११० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने शनिवारी (ता.३) केला. त्यामुळे लाड़ यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

पिंपरी : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad Lad) यांचे कुटुंबिय संचालक असलेल्या कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामात ११० कोटी रुपयांचा घोटाळा (110 Crores scham in Smart city) केल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena leader made alligation) केला. त्यामुळे लाड़ यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

भाजपने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. तर,परिवहनमंत्री अनिल परब व  शिवेसनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही चौकशीची भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या केली आहे. त्यामुळे  आता शिवसेनेनेही भाजपला लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. त्यांनीही भाजप आमदार लाड यांच्यावर आज निशाणा साधला. 

कुठलाही लोकप्रतिनिधी वा त्याच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी ठेका कायद्याने घेता येत नाही.तसं झालं,तर संबधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द होते. या न्यायाने लाड यांच्या कुटुंबातील चार सदस्य संचालक असलेल्या क्रेस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.ने पिंपरी पालिकेच्या स्मार्ट सिटीतील ५२० कोटी रुपयांचे काम घेतल्याने त्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शहरप्रमुख अॅ़ड सचिन भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषदेत केली. एवढेच नाही,तर या कामात या कंपनीने ११० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या घोटाळ्याची ईडी चौकशीही व्हावी,असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, लाड हे वरचेवर पिंपरीत येऊन जातात,यातूनही त्यांचा हेतू व सहभाग स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.मूळात या निविदेसाठी साडेतीनशे कोटी रुपयांची तरदूद होती,मग हे काम पाचशे वीस कोटींना दिलेच कसे अशी विचारणा त्यांनी केली. ना भय, ना भ्रष्टाचार, ना खाऊंगा, ना खाने दूंगा अशी घोषणा देत पिंपरी पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने त्यातील ना काढून भय,भ्रष्टाचार आणि खाऊंगा एवढाच अंमल केल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. 

क्रेस्टल कंपनीने बाजारात १० ते १५ हजार रुपयांना मिळणारा पाण्याचा मीटर एक लाखाच्या भावाने असे नऊ हजार मीटर खरेदी केले.त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला ७३ कोटी रुपयांचा फटका बसला. सर्व्हर रुमच्या दोन फायरवॉलसाठी ११ कोटी रुपये जास्त मोजण्यात आले. २१ लाखाचा २५० केव्हीएचा डिझेल जनरेटर दोन कोटी ५८ लाख रुपयांना घेण्यात आला. या कंपनीने वेळेत काम पूर्ण न केल्याने तिला २५ ते ३० कोटी रुपयांचा दंड करण्याऐवजी तो फक्त काही लाखाचाच केला,असे गैरव्यवहाराचे आरोप या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आ. लाड यांच्या कुटुंबाच्या कंपनीवर केले.याआरोपावर आपले म्हणणे देण्यासाठी आ. लाड यांना फोन केला असता तो त्यांच्या पीएने घेतला. लाड उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
...
हेही वाचा...

प्रत्येक पोलिस शिपाई हा फौजदार म्हणून निवृत्त होणार...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख