भाजप नगरसेवकाने दिली स्वतःच्याच मुलाला धमकी

मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून घेण्यासाठी भाजप नगरसेवकाने स्वतःच्याच मुलाला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भाजप नगरसेवकाने दिली स्वतःच्याच मुलाला धमकी
bjp corporator threatens his son for property

पिंपरी : निवडणुकीवेळी मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून देण्यासाठी भाजप नगरसेवकाने स्वतःच्याच मुलाला धमकी दिली. याप्रकरणी नगरसेवकाच्या पत्नीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लक्ष्मण उंडे (वय 55) असे अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. तर यमुना उंडे (वय 44, रा. साई पार्क, दिघी) यांनी गुरुवारी (ता. 21) फिर्याद दिली आहे. लक्ष्मण उंडे हे 2017 मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दिघी येथील प्रभाग क्रमांक चारमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. 

लक्ष्मण उंडे यांनी त्यांचा मुलगा दीपक उंडे यांना 14 फेब्रुवारीला धमकी दिली. "हे घर मी जागा घेऊन बांधले आहे. निवडणुकीच्यावेळी मी हे घर माझ्या नावावरून तुझ्या नावावर केले आहे. ते आता माझ्या नावावर परत कागदोपत्री करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला घरात व दिघी गावात राहू देणार नाही', अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in