भाजप नगरसेवकाला पलिकेतच कोणी केली मारहाण? 

पिंपरी-चिंचवड महापलिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विलास मडेगिरी यांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी (ता. 1) घडली.
भाजप नगरसेवकाला पलिकेतच कोणी केली मारहाण? 
BJP corporator beaten in Pimpri-Chinchwad

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापलिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विलास मडेगिरी यांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी (ता. 1) घडली.

त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून मारहाणीबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती. तसेच याबाबत भाजपचा कोणताही पदाधिकारी बोलण्यास तयार नाही. 

महानगरपालिका भवनामध्ये तिसऱ्या मजल्यावर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच ऍन्टी चेंबर आहे. तिथे मडेगिरी बसले होते. त्या वेळी अचानक आरडाओरड सुरू झाली. ती ऐकून काही पदाधिकारी, नगरसेवक घटना स्थळाकडे धावले. या वेळी रक्तदाब वाढल्याने मडेगिरी खाली कोसळले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांना तत्काळ महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

वादाचा विषय भूसंपादन

गेल्या वर्षापासून भूसंपादनाचा विषय स्थायी समितीमध्ये प्रलंबित आहे. मडेगिरी अध्यक्ष असल्यापासून हा विषय सतत तहकूब होत आहे. खासगी वाटाघाटीने भूसंपादनाऐवजी टीडीआरनुसार मोबदला देण्यास मडेगिरी आग्रही आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांचे भूसंपादन रखडले आणि मोबदलाही मिळालेला नाही, असे जमीनमालकांचे म्हणणे आहे. हेच मूळ कारण या मारहाणीमागे असल्याचे काहींनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in