अजितदादांनी बारामतीत पुन्हा करून दाखविले! 

राज्यातील अनेक शहरांना जे जमले नाही, ते कोरोनामुक्तीचे स्वप्न बारामती शहराने प्रत्यक्षात उतरवून दाखविले. नेतृत्वाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्‍य नसते. ही बाब या कोरोना संकटाच्या काळात बारामतीत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अजितदादांनी बारामतीत पुन्हा करून दाखविले! 
Baramati became Corona free

बारामती : राज्यातील अनेक शहरांना जे जमले नाही, ते कोरोनामुक्तीचे स्वप्न बारामती शहराने प्रत्यक्षात उतरवून दाखविले. नेतृत्वाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्‍य नसते. ही बाब या कोरोना संकटाच्या काळात बारामतीत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

बारामती शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक जे नियोजन केले व समन्वय साधला, त्याचा परिणाम म्हणून आज दोन महिने बारामतीत कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांचा समन्वय घडवत लोकांनाही आवाहन करत पवार यांनी प्रारंभी "भिलवाडा' व त्या पाठोपाठ "बारामती पॅटर्न'ची अंमलबजावणी करण्यासाठी जो पाठपुरावा केला, त्याची फलनिष्पत्ती कोरोनामुक्तीच्या दिशेने शहराची वाटचाल होण्यात दिसली. 

बारामतीत कोरोना रुग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यानंतर त्याचे प्रमाणत वाढते आहे, असे निदर्शनास आल्यानंतर अजित पवार यांनी सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. या काळातही राज्याची जबाबदारी असतानाही त्यांनी आठवड्यातून दीड दिवस बारामतीसाठी देण्याचा प्रयत्न केला. अधिकारी व पदाधिकारी यांचा समन्वय साधत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न, गरजूंना किटच्या माध्यमातून मदत, आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या चाचण्या व कोविड केअर सेंटरची उभारणी वेगाने व्हावी, याचा पाठपुरावा अशी अनेक कामे अजित पवार यांनी मार्गी लावली. 

अजित पवार यांच्या कामाची पद्धत अधिकारी व पदाधिकारी यांना माहिती असल्याने कामेही वेगाने मार्गी लागली. बारामतीत कोविड केअर सेंटर सुरू झाले. कोरोना तपासण्यासाठी पुण्याला जावे लागायचे, तेही बंद करत बारामतीच्याच वैद्यकीय महाविद्यालयात या तपासण्या सुरु ककरण्यात आल्या. 

लॉकडाउनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये व घरपोच वस्तू मिळाव्यात, या उद्देशाने "बारामती पॅटर्न'ची निर्मिती करतानाही अजित पवार यांनी अनेक सूचना केल्या. जेथे जेथे सरकार स्तरावर अडचणी निर्माण झाल्या, त्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम लोकांची गैरसोय फारशी झाली नाही. अशी अभूतपूर्व स्थिती बारामतीत प्रथमच निर्माण झाली होती, त्या मुळे समाजातील प्रत्येक घटकच अस्वस्थ होता. मात्र, सर्वांना या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीरपणे अजित पवार उभे राहिले. वेगाने निर्णय घेत त्यांनी ज्या उपाययोजना राबविल्या. त्यामुळे बारामतीत गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. 

स्थलांतर करून बारामतीत राज्य व परराज्यातूनही लोक आलेले आहेत, मात्र तेथेही शिस्तीचे पालन होत असल्याने आजतरी स्थिती तुलनेने चांगली आहे. बारामतीची बाजारपेठही पूर्ववत झाल्याने हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in