बापूराव सोलनकरांना व्हायचंय, शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष ! 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड विधानसभा निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी पक्षाच्या श्रेष्ठीकडे केली आहे.
बापूराव सोलनकरांना व्हायचंय, शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष ! 
Bapurao Solankar's demand for the chairmanship of Goat and Sheep Mahamandal

पुणे : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड विधानसभा निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी पक्षाच्या श्रेष्ठीकडे केली आहे. 

मागील सरकारच्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बाळासाहेब दोडतले यांची नेमणूक या पदावर भाजप सरकारने केली होती. पण सध्या हे पद रिकामे आहे. महाविकास आघाडीकडून या महामंडळाचे अध्यक्षपद नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे महामंडळ घ्यावे, अशी मागणी पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. काही कार्यकर्त्यांनी आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशा प्रकारची भूमिका घ्यावी, असे मागणी कार्यकर्ते करत आहेत. 

धनगर समाजाच्या उन्नतीसाठी अस्तित्वात आलेल्या शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागलेले असतानाच आता बारामतीच्या बापूराव सोलनकर यांनी "मला अध्यक्षपद द्यावे' अशी मागणी केली आहे 

बापूराव सोलनकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड मतदारसंघाचे निरीक्षक आहेत. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुमारे एक वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर दौंड विधानसभा निरीक्षकाची जबाबदारी सोपवली. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. 
 

जळगाव कॉंग्रेस म्हणतेय, "शासकीय समित्या लवकर घोषित करा' 

 जळगाव : अंतर्गत वादामुळे जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसची स्थिती अत्यंत कमजोर होती. गेल्या पाच वर्षात पक्षातील अंतर्गत वाद मिटवून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोचविली आहे. आता पक्ष सत्तेत असून जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी शासकीय समित्या घोषित करून त्याच्या सदस्यपदांवर कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, असे पत्र जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. 

जळगाव जिल्ह्यात एकेकाळी कॉंग्रेसचे दोन खासदार होते, आमदार होते आणि जिल्हा परिषदेवर सत्ता होती. या शिवाय जिल्हातील सहकारी क्षेत्रातही कॉंग्रेस बळकट होती. मात्र 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर जिल्ह्यात कॉंग्रेसला उतरती कळा लागली, त्यात अंतर्गत वादही वाढले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस अधिकच कमकुवत झाली. गेल्या पंचवार्षिकमध्ये तर जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार नव्हता. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत रावेर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे शिरीष मधुकरराव चौधरी हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात कॉंग्रेसने ही एकमेव जागा लढविली होती. त्यात त्यांना यश मिळाले, ही मोठी जमेची बाजू आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in