हॉटेलचालकांना खंडणी मागणाऱ्या PSIची वर्दी जप्त   

हॉटेल व्यवस्थापकाला कारवाईची धमकी देऊन तीन हजार रुपयांची खंडणी घेतली.
हॉटेलचालकांना खंडणी मागणाऱ्या PSIची वर्दी जप्त   
Milan Kurkute .jpg

पुणे : मुंढवा भागातील तीन हॉटेल चालकांकडून सात हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या पोलिस (Police) उपनिरीक्षकाला न्यायालयाने तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर शुक्रवारी जामीन मंजूर केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी हा निर्णय दिला. त्याच्याकडून गणवेश, मोटार आणि रक्कम जप्त करण्यात आली. (Bail granted to Sub-Inspector of Police)   

मिलन शंतनू कुरकुटे (वय ३२, रा. कासारवाडी) याला न्यायालयाने जामी मंजूर केला. मिलन कुरकुटे हा हिंजवडी पोलिस ठाण्यात नियुक्तीला आहे. तरीही मंगळवारी तो रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी गाडीतून गणवेशात मुंढव्यातील हॉटेलमध्ये गोला होता. ताबडतोब हॉटेल बंद करा, अन्यथा मी तुमच्या हॉटेलवर कारवाई करीन. असे हॉटेलचे व्यवस्थापकाला बजावले. कारवाई होवू द्यायची नसेल तर मला दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने हॅाटेल चालकाकडून पैसे घेतले. 

त्यानंतर दुसऱ्या हॉटेल व लॉजमध्ये जाऊन कुरकुटे याने दोन हजार रुपयांची खंडणी घेतली. दोन्ही ठिकाणी खंडणी घेतल्यानंतर त्याने तीसऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला कारवाईची धमकी देऊन तीन हजार रुपयांची खंडणी घेतली. असे तक्रारीत नमूद आहे. अटक झाल्यानंतर कुरकुटे याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

शुक्रवारी कुरकुटे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याने ॲड. अमेय डांगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. कुरकुटे याच्याकडून गणवेश, कार आणि रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस तपासास सहकार्य करण्यास तयार आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा आहे. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. डांगे यांनी केला. पोलिस उपनिरीक्षक एच. एस. गिरी प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in