माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला 

पुण्यातील कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना जाब विचारला; म्हणून चार जणांनी विलास कोल्हे, राहुल कोल्हे यांच्यावर शनिवारी हल्ला केला.
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला 
Attack on former MLA Medha Kulkarni

कोथरूड  : पुण्यातील कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांना जाब विचारला; म्हणून चार जणांनी विलास कोल्हे, राहुल कोल्हे यांच्यावर शनिवारी हल्ला केला. 

या घटनास्थळापासून जवळच राहावयास असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या काय झाले; म्हणून विचारणा करण्यासाठी घटनास्थळी गेल्या. त्यावर या तरुणांनी मेधा कुलकर्णी यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली आहे. कोथरूड पोलिसानी चार जणांना ताब्यात घेतले असून 354 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, या परिसरात दारूड्यांचा मोठा त्रास होत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. आजच्या घटनेसंदर्भात पोलिसांना कळवल्यानंतरही ते लवकर आले नाहीत. 

दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ व नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पोलिस व्यस्त होते, असे या वेळी सांगण्यात आले. 
 

देवाच्या आळंदीत भरतेय जुगाऱ्यांची जत्रा 

आळंदी : आळंदी (ता. खेड) येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता.4) रात्री छापा टाकला. मात्र, तो जुगाराचा अड्डा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने तोडपाणी झाली की काय, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उभारले जात आहे. 

मंदिर परिसरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर गुरुवारी (ता. 4) चार पोलिसांनी टाकलेल्या छाप्याच्या चर्चेने आळंदी पोलिसांचा कारभार उजेडात आला. भरलोकवस्तीत आणि तेही मंदिर परिसरात सध्या दोन जुगाराचे अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे. शहरातील प्रतिष्ठीत लोक या ठिकाणी तासनतास जुगार खेळत असत. खेळाडूंना मद्य, चहा कॉफी, नाष्टा जागेवर दिला जाई. त्यामुळे गर्दी वाढत होती. 

जुगार अड्डयांना बरकत 

कोरोनाच्या काळात संचारबंदी असतानाही आळंदीतील जुगार अड्ड्यांवर चांगली बरकत होती. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी रात्रीच्या वेळी पोलिसांनी छापा टाकला आणि जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली. छापा टाकला खरा मात्र हा जुगार अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. महिना हप्ता देण्याबाबत तोडपाणी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मुळात माउली मंदिरासारख्या महत्वाच्या परिसरात जुगार अड्डा रोजरोस चालतो, हेच आळंदीकरांसाठी लांच्छनास्पद आहे. मात्र यामध्ये चिरमिरी नाही, तर भरघोस मलिदा मिळत असल्याने पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in