आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर भाजपनं सोपवली 'ही' जबाबदारी... - Appointment of MLA Madhuri Misal in charge of Pimpri-Chinchwad BJP | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर भाजपनं सोपवली 'ही' जबाबदारी...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 जानेवारी 2021

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आमदार माधुरी मिसाळ यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले. 

पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांची पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

मिसाळ या २००९ पासून सलग तीन वेळा पर्वती मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. सध्या विधानसभेतील भाजपच्या प्रतोद म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या 'सार्वजनिक उपक्रम  समिती' आणि महिला सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या 'शक्ती कायदा समिती'च्या त्या सदस्या आहेत. प्रदेश चिटणीस, पुणे शहर अध्यक्ष, बारामती लोकसभा प्रभारी अशा विविध संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले आहे.

हेही वाचा : अण्णा हजारेंना समजविण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता राज्यातले भाजप नेते जागे झाले असून अण्णा हजारे यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. याचसाठी काल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. प्रत्येकाला आपल्या श्रमाचे दाम मिळावे व कोणाचेही शोषण होऊ नये, ही लोक कल्याणकारी सरकारची जबाबदारी असते.

आपल्या देशात जो जनतेचे पोषण करतो, त्याच शेतकऱ्यांचे शोषण केले जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, या साठी मी दिल्ली येथे सात दिवस उपोषण केले होते. त्या वेळी आपल्या कार्यालयाने लेखी आश्वासन दिले ते आपण पाळले नाही. म्हणून मी जानेवारी महिण्याच्या अखेरीस दिल्ली येथे पुन्हा माझ्या जीवनातील शेवटचे उपोषण करत आहे, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पाठविले आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, ''दिल्ली येथे रामलिला मैदानावर २०१८ साली मी सात दिवसांचे उपोषण केले, त्यावेळी केंद्रीय  कृषी मंत्री गजेंद्र शेखावत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्वासन घेऊन माझे उपोषण सोडण्यासाठी पाठविले होते. त्यात उल्लेख केला होता, की सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्थिक बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे. असे लखी पत्र दिले होते ते पत्र सुद्दा मी आपणास माहितीस्तव पाठवत आहे.  ''
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख