पिंपरीत आणखी एका नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे शुक्रवारी (ता. 31 जुलै) कोरोनामुळे निधन झाले. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादीचे आणखी एक विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे नुकतेच निधन झाले आहे. एका महिन्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नगरसेवकाचे पिंपरीत निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरीत आणखी एका नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन 
Another corporator in Pimpri-Chinchwad died due to corona

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे शुक्रवारी (ता. 31 जुलै) कोरोनामुळे निधन झाले. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादीचे आणखी एक विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे नुकतेच निधन झाले आहे. एका महिन्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नगरसेवकाचे पिंपरीत निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

नगरसेवक शेख यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती आणखी बिघडल्याने बुधवारी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शेख हे 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर 2012 व 2017 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. 

गेल्या तीन महिन्यात पिंपरीतील डॉक्‍टर, नगरसेवक, पदधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील बरेच जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. मात्र, यापूर्वी नगरसेवक दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचेदेखील मागील आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले. 

कोरोना संकटाच्या काळात नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नागरिकांना मदत करण्यासाठी बाहेर पडत आहेत. डॉक्‍टर, तसेच रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. मात्र, पुरेशा काळजीअभावी या सर्वांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातील काही जणांच्या जिवावर बेतत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कोरोना संकटाच्या काळात काम करणाऱ्या प्रत्येकाने पुरेशी काळजी घेऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन पिंपरी महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 


पीपीई किट घालून आमदार जयकुमार गोरेंनी साधला कोरोनाबाधितांशी संवाद 

बिजवडी (ता. माण) : मायणी (ता.खटाव) येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद हॉस्पिटल ऍण्ड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, रिसर्च सेंटर येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांशी आमदार जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. पीपीई किट परिधान करुन त्यांनी रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये प्रवेश केला. कोरोनाबाधित रुग्णांची नेमकी मनस्थिती त्यांनी जाणून घेतली. तसेच रुग्णांशी संवाद साधताना त्यांची मानसिकता सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला. 

मायणी (ता.खटाव) येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद हॉस्पिटल ऍण्ड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, रिसर्च सेंटर येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांशी आमदार जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. पीपीई किट परिधान करुन त्यांनी रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये प्रवेश केला. कोरोनाबाधित रुग्णांची मनस्थिती त्यांनी जाणून घेतली. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in