आळंदीतील महाराजाकडून शरद पवारांची सोशल मीडियातून बदनामी 

ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियातून अत्यंत खालची भाषा वापरून बदनामी केल्याप्रकरणी आळंदीतील संबंधित महाराजावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आळंदी पोलिसांकडे केली आहे.
आळंदीतील महाराजाकडून शरद पवारांची सोशल मीडियातून बदनामी 
At Alandi defames Sharad Pawar on social media

आळंदी (जि. पुणे) : ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियातून अत्यंत खालची भाषा वापरून बदनामी केल्याप्रकरणी आळंदीतील संबंधित महाराजावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आळंदी पोलिसांकडे केली आहे. 

संबंधित महाराजावर कायदेशीर कारवाई न केल्यास आळंदी बंद आंदोलनाचे आवाहनही करण्यात येत असल्याचे पत्रही दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिले आहे. दरम्यान, बदनामी करणारा संबंधित महाराज मात्र आळंदीतून परागंदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, पुष्पा कुऱ्हाडे, संदीप नाईकरे, योगेश सातपुते, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांना दिले. 

आळंदीतील एका महाराजाने नुकतेच त्याच्या फेसबुक पेजवरून बदनामीकारक पोस्ट केली होती. त्याला शोधण्यासाठी कार्यकर्ते आळंदीतील त्याच्या घरी गेले असता वॉचमनने तो बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन कारवाई बाबतचे निवेदन दिले आहे. 

संबंधित महाराज हा वारकरी संप्रदायातील असून अनेक वर्षांपासून आळंदीतच राहतो. मागील काही दिवसांपूर्वी दर्शनबारीच्या मुद्द्यावरूनही त्याने हातात दंडुका घेऊन फोटो व्हायरल करत आळंदीतील तरुणांबरोबर पंगा घेतला होता. आता तर त्याने थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत आणि खालच्या स्तरावर व्यंग्यात्मक भाषा वापरून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. यामुळे चिडलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले. 

याबाबत आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संबंधित महाराज हा परगावी म्हणजे नाशिकला गेला आहे. आळंदीत आल्यावर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे चालत नाही, अशा सरकारमधून बाहेर पडा  

आळंदी  :आधी नोटबंदी आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात आहे. अशावेळी शिक्षण सम्राटांकडून आजही शालेय शिक्षणाच्या शुल्कासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात आहे. शालेय शुल्क आणि वाढीव वीजबिलांपासून नागरिकांना दिलासा मिळावा; म्हणून पत्रव्यवहार करूनही राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडून अद्याप न्याय दिला जात नसल्याची तक्रार आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी केली आहे. 

आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पत्रव्यवहार करून राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना सदबुद्धी देण्याबाबतची विनंती केली आहे. एवढ्यावरच न थांबता शालेय शुल्क आणि वीज बीलाबाबत दिलासादायक भूमिका न घेतल्यास कॉंग्रेस मंत्र्यांच्या विरोधात आळंदीत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, शहर सचिव संदिप नाईकरे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश सातपुते यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, राज्यातील काही मंत्री वैयक्तिक स्वार्थासाठी मंत्रिपदाचा वापर करत असतील तर कॉंग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडलेले बरे. पक्षाची प्रतिमा मलिन होत असताना राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना लोकहिताला प्राधान्य देण्याचे आदेश देवून काम करण्यास सांगावे, असे साकडे कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना घातले आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in