पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आळंदी कॉंग्रेस कमिटी बरखास्त  - Alandi Congress Committee dismissed for taking anti-party stance | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आळंदी कॉंग्रेस कमिटी बरखास्त 

विलास काटे 
सोमवार, 7 डिसेंबर 2020

हकालपट्टी केलेल्या कार्यकर्त्यांचा आता कॉंग्रेस पक्षाशी काही संबंध नाही. 

आळंदी : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेत पदाधिकारी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या आदेशावरून आळंदी (ता. खेड) शहर कॉंग्रेस कमिटी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहे. 

खेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय डोळस यांनी याबाबतचे पत्र पाठवून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली आहे. डोळस यांनी पाठवलेले हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने आळंदी शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे. 

डोळस यांनी पत्रात म्हटले की, प्रत्येक निवडणुकीत आळंदी शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी हे पक्षविरोधी काम करत असतात. नुकतेच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदान प्रक्रियेतही हाच अनुभव आला आहे.

दरम्यान, हकालपट्टी केलेल्या कार्यकर्त्यांचा आता कॉंग्रेस पक्षाशी काही संबंध नसून आता लवकरच नवीन कार्यकारिणीही जाहीर केली जाणार आहे, असे तालुकाध्यक्ष डोळस यांनी सांगितले. मात्र, कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख पत्रात नाही. 

वस्तुताः आळंदी शहर कॉंग्रेसमधे पदाधिकारी कोण, त्यांची नियुक्ती कधी झाली. याबाबतही अनेक वाद विवाद आहेत. वर्षांनुवर्षे निवडणूक आली की कॉंग्रेसचे चिन्ह खिशावर लटकून फिरत असतात. मात्र, पक्षवाढीसाठी तसेच स्थानिक नगरपालिका निवडणुकीतही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्यांनी कधीही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरलेला नाही, त्यामुळे कॉंग्रेसमध्ये पदाधिकारी आहेत काय? किंवा नाय काय, याचे आळंदीकरांना मात्र सोयरसुतक नव्हते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख