Ajinkya Ghule dies of heart attack | Sarkarnama

हवेलीचे माजी उपसभापती अजिंक्‍य घुले यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 28 मे 2020

हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिंक्‍य सुरेश घुले (वय 33) यांचे आज सकाळी ह्‌दयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

मांजरी : हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिंक्‍य सुरेश घुले (वय 33) यांचे आज सकाळी ह्‌दयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सुरेश घुले यांचे ते पुत्र होत. वडिलांप्रमाणेच ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे संघटन केले होते. परिसरातील विविध कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला होता. त्यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये हवेली पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक मांजरी बुद्रूक या गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्याच वर्षी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उपसभापती पदी काम करण्याची संधी दिली. सुमारे सव्वा वर्षे त्यांनी या पदाच्या माध्यमातून मांजरी परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. 

सध्या ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अण्णासाहेब मगर कला क्रीडा मंडळ आणि सुरेश अण्णा घुले मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ते परिसरात काम करायचे. दरवर्षी ते सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत होते. त्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरिबांना दिलासा दिला आहे.

त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे मांजरी गावावर शोककळा पसरली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख