PCMC मध्ये खळबळ : स्थायी समिती अध्यक्ष लांडगेंच्या पीएला लाच घेताना पकडले...

भाजपसाठी अडचणींचे छापे...
pcmc-building-final
pcmc-building-final

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) स्थायी समितीच्या बैठकीत आज सुमारे 45 कोटी रुपयांच्या निविदांचे विषय मंजूर झाले. नेहमीप्रमाणे बैठक संपल्यानंतर सदस्य एकत्रित एका रुममध्ये गेले. तेथे काही चर्चा आणि इतर `रिवाजा`प्रमाणे वाटप होणाऱ्या प्रमुख बाबी पूर्णत्वास जाण्याच्या आधीच  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने छापा टाकला. एसीबीच्या या छाप्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  (ACB raids PCMC office)

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला असून मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे केबिनही या पथकाने सील केले आहे. स्थायी समितीचे मुख्य लिपिक व अध्यक्षांचे पीए म्हणून काम पाहणारे ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद पिंगळे, यांच्यासह एका शिपाई राजेंद्र शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाची कारवाई महापालिकेत नवीन नाही. एखादा कर्मचारी किंवा अधिकारी हा सापळ्यात अडकतो. या वेळी मात्र स्थायी समितीच्या बैठकीवरच हा छापा पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

 सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन छापा पडल्याचे सांगण्यात येत आहे. ४५ कोटी रुपयांचे विषय आजच्या बैठकीत मंजूर झाले होते.

स्थायी समितीचे अध्यक्षपद नितीन लांडगे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. लाचपुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीचे कार्यालय सील केले आहे. नितीन लांडगे हे भाजपचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com