राष्ट्रवादीच्या पदाधिकारी पद्मादेवी राजेभोसले व त्यांच्या पतीचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू

संभाजीराजे राजेभोसले व पद्मादेवी राजेभोसले यांच्या मुलीचा येत्या 4 जून 2021 रोजी विवाह सोहळा होता.
Padmadevi Rajebhosle and her husband Sambhaji Raje Rajebhosle died on the same day due to corona
Padmadevi Rajebhosle and her husband Sambhaji Raje Rajebhosle died on the same day due to corona

भिगवण (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress) दौंड तालुका (Daund) महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पद्मादेवी राजेभोसले (Padmadevi Rajebhosle) (वय 48) आणि त्यांचे पती संभाजीराजे राजेभोसले (SambhajiRaje Rajebhosle ) (वय 52)  या पती-पत्नीचे काही तासांच्या अंतरात एकाच दिवशी कोरोनामुळे (corona) निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, तीन भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राजेभोसले यांच्या निधनाचे वृत्त समजाताच खानवटे गावावर शोककळा पसरली आहे. (Padmadevi Rajebhosle and her husband Sambhaji Raje Rajebhosle died on the same day due to corona)

संभाजीराजे राजेभोसले व पद्मादेवी राजेभोसले यांच्या मुलीचा येत्या 4 जून 2021 रोजी विवाह सोहळा होता. मुलीच्या डोईवर अक्षता टाकून कन्यादान करण्यापूर्वीच नियतीने या दांपत्यावर काळाचा घाला घातला. या घटनेमुळे राजेभोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दौंड तालुक्यातील खानवटे येथील संभाजीराजे राजेभोसले व पद्मादेवी राजेभोसले यांच्या मुलीचा 4 जून 2021 रोजी विवाह सोहळा होता. राजेभोसले पत्नी पत्नी आणि नातेवाईक विवाह सोहळ्याची तयारी करत होते. ही तयारी सुरू असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. जादा त्रास होऊ लागल्यामुळे या दोघांनाही भिगवण येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 

राजेभोसले दांपत्यावर अठरा दिवसांपसून उपचार सुरु होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावतच गेली. उपचाराची शिकस्त करूनही त्यांच्यावर कोरोनाने घाला घातला. कोरोनामुळे प्रथम पद्मादेवी राजेभोसले यांचे निधन झाले, त्यानंतर काही तासांच्या अंतरातच संभाजीराजे राजेभोसले यांचाही मृत्यू झाला. 

संभाजीराजे राजेभोसले हे शहाजीराजे राजेभोसले सावर्डेकर यांचे पुत्र होत, तर पद्मादेवी राजेभोसले या दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. दौंड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये महिला बचत गटाची चळवळ वाढविण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. 

राजेभोसले पती पत्नीच्या निधनाची माहिती मिळताच खानवटे (ता. दौंड) गावावर शोककळा पसरली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष उदयसिंह राजेभोसले हे त्यांचे बंधू होत. राजेभोसले पती पत्नीच्या निधनाबद्दल बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com