खासदार संभाजीराजेंनी केला जेजुरीत कुलधर्म - कुलाचार - MP Sambhaji Raje visited Khandoba temple of Jejuri | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार संभाजीराजेंनी केला जेजुरीत कुलधर्म - कुलाचार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

गडाच्या पायरी मार्गावर साकारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची माहिती घेतली.

जेजुरी (जि. पुणे)  ः कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे यांनी गुरुवारी (ता. 28 जानेवारी) दर्शन घेत कुलधर्म कुलाचार केला. 

खासदार युवराज संभाजीराजे यांचे आज दुपारच्या सुमारास जेजुरी गडावर आगमन झाले. ‘श्रीं’ची माध्यान्ह पुजा-अभिषेक खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, विक्रम शिंदे, सागर जगताप, संतोष हगवणे, आनंद जंगम, संतोष बयास आदी मान्यवर उपस्थित होते. 

कुलधर्म-कुलाचार व तळीभंडार केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, बाळा खोमणे यांच्याशी चर्चा करत देवसंस्थानची विविध विकासकामे, येथील ऐतिहासिक घटना व सध्या जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर साकारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची माहिती घेतली. देवसंस्थानच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख