सदाभाऊ खोत यांना धक्का : रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी केला शिवसेनेत प्रवेश

म्हणून आम्हाला शिवसेनेशी जवळीक वाटते.
Mauli Aher, Pune District President of Rayat Kranti Shetkari Sanghatana, joins Shiv Sena
Mauli Aher, Pune District President of Rayat Kranti Shetkari Sanghatana, joins Shiv Sena

केडगाव (जि. पुणे) : रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांना पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्ह्याध्यक्ष माऊली आहेर यांनी संघटना सोडली असून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र राजकारण करू पाहणाऱ्या खोत यांना जिल्हाध्यक्षांसारखे सहकारी सोडून जात असल्याने संघटनेला विचार करायला लावणारे आहे. (Mauli Aher, Pune District President of Rayat Kranti Shetkari Sanghatana, joins Shiv Sena)  

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माउली आहेर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी या कार्यकर्त्यांच्या हातात चौफुला (ता. दौंड) येथे शिवबंधन बांधले.

या वेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे शंकर शितोळे, प्रशांत जगताप, बाळासाहेब कोंडे, गणेश गायकवाड आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. दौंड विधानसभा मतदार संघातील शेतकरी संपत शिंदे, रमेश कुदळे, मारुती गावडे, शिवाजी पवार, साहेबराव शितोळे, निखिल शितोळे, रमेश शितोळे, अमोल कुऱ्हाडे, शुभम ढमे यांनीही हाती शिवबंधन बांधत हाती भगवा झेंडा धरला आहे. 

चौफुला येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात महेश पासलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देविदास दिवेकर, विभाग प्रमुख हनुमंत निगडे आदी उपस्थित होते. 

पासलकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वर्षापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, त्या अनुषंगाने दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची अंदाजे 400 कोटी रूपयांची कर्जमाफी झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे हे शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे  शेतकरी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढत आहे. आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. 

शिवसेनेत प्रवेश करणारे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली आहेर म्हणाले की, शिवसेनेत 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण होते; म्हणून आम्हाला शिवसेनेशी जवळीक वाटते. त्यातून आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती शेतकरी संघटना नावाची स्वतंत्र संघटना काढली. लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी कांग्रेस आघाडीला, खोत यांनी भाजपला पाठींबा दिला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. राजू शेट्टी यांना शह देण्याच्या हेतूने सदाभाऊ खोत यांनी या संघटनेची घोषणा केली खरी पण, संघटनेने राज्यात म्हणावे तसं बाळसं धरलेले दिसत नाही. त्यातच आहेत तेही सहकारी सोडून जात असल्याने ते खोत यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com