भाजप उमेदवाराच्या मतांपेक्षा जादा लीड घेत जयंत आसगावकर विजयी  - Jayant Asgaonkar of Mahavikas Aghadi won from Pune Shikshak constituency | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप उमेदवाराच्या मतांपेक्षा जादा लीड घेत जयंत आसगावकर विजयी 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

आसगावकर यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे 34 फेऱ्यापर्यंत मतमोजणी करावी लागली.

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेत विद्यमान आमदार तथा अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांचा 10 हजार 628 मतांनी पराभव केला. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार हे तिसऱ्या स्थानी होते. आसगावकर यांचे मताधिक्‍य पवार यांना मिळालेली जास्त आहे. 

पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजपचे जितेंद्र पवार, विद्यमान आमदार तथा अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत या प्रमुख उमेदवारांसह 35 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. आसगावकर, पवार आणि सावंत यांच्यात मुख्य लढत होती.

आसगावकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मताधिक्‍क्‍य घेतले होते. त्यांना भाजपचे पवार यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार सावंत यांनीच लढत दिली. त्यामुळे आसगावकर यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे 34 फेऱ्यापर्यंत मतमोजणी करावी लागली.

गुरुवारी (ता. 3 डिसेंबर) सुरू झालेली मतमोजणीत अखेर शुक्रवारी (ता. 4 डिसेंबर) सायंकाळी शेवटच्या 34 व्या फेरीत आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेऊन विजयाचा कोटा पूर्ण केला. आसगावकर यांनी 10 हजार 628 मतांनी विजय मिळवला. 

पुणे शिक्षक मतदारसंघात विक्रमी 73.04 टक्के मतदान झाले होते. सुमारे 52 हजार 987 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील 50 हजार 226 मते वैध, तर 2 हजार 784 अवैध मत ठरली. विजयासाठी 25 हजार 114 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला होता. 

"माझ्या विजयात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिक्षक, संस्था, संघटना यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले. रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थांनी त्यांचे बहुमोल मत माझ्या पारड्यात टाकले,' असे जयंत आसगावकर यांनी विजयानंतर सांगितले. 

प्रमुख उमेदवारांना पडलेली मते 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


जयंत आसगावकर 25 हजार 985 
दत्तात्रेय सावंत 15 हजार 357 
जितेंद्र पवार 7 हजार 294 
गोरखनाथ थोरात 5 हजार 306 
प्रकाश पाटील   2 हजार 758