फरारी गजा मारणेच्या मुसक्‍या आवळल्या; मेढा पोलिसांनी केली अटक 

मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला जेरबंद केले.
Fugitive Gaja Marane arrested in Satara district
Fugitive Gaja Marane arrested in Satara district

सातारा : पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरारी झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने जेरबंद केले. फरारी झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात होते. तो मेढ्यात शनिवारी (ता. 6 मार्च) डस्टर गाडीतून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी सापळा रचत गुंड गजा मारणे याच्या मुसक्‍या आवळल्या. 

याबाबत अधिक माहिती अशी, तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून पुण्यापर्यंत शक्ती प्रदर्शन करत पुणे-मुंबई महामार्गावर धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. मात्र, पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरारी झाला होता. 

फरारी झालेला गजा मारणे हा महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, शनिवारी जावळी तालुक्‍यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला जेरबंद केले. 


हेही वाचा : गजा मारणेच्या नऊ साथीदारांना पोलिसांनी पकडलं अन्‌ ते चोवीस तासांत बाहेर! 

पिंपरी : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या विरोधात कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सरसावले आहेत. दहशत माजवल्याच्या आरोपाखाली गजा मारणे टोळीतील नऊ जणांना पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती. मात्र, हा गुन्हा जामीनपात्र असल्याने 24 तासांच्या आतच त्यांची न्यायालयातून सुटका झाली. 

दहशत माजवल्याच्या गुन्ह्यात या नऊजणांना पुण्यातील कोथरुड पोलिसांनी पकडले होते. त्यांच्या मोटारी व मोबाईलही पोलिसांनी जप्त केलेले आहेत. त्या गुन्ह्यात त्यांची जामिनावर सुटका होताच लगेच हिंजवडी पोलिसांनी त्यांना आपल्याकडील तशाच गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन  न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयात त्यांना जामीन झाला. त्यामुळे त्यांची सुटका झाली. 

दरम्यान, अशाच प्रकारचा तिसरा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असल्याने त्यात आता हे आरोपी वर्ग करून घेतले जाण्याची शक्‍यता आहे. कोथरुड व तळेगावमधील जामीनपात्र गुन्ह्यात अटकेची कारवाई केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस गजा व त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोड्याच्या गुन्ह्यात अशी कारवाई करतील. त्यानंतर ते मोकान्वये त्यांच्या मुसक्‍या आवळणार आहेत. 

दोन खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होताच तळोजा कारागृहातून सुटका झालेल्या गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या महिन्यात 15 तारखेला तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा तळेगावला लगेच दाखल झाला होता. त्यानंतर कोथरूड, वारजे, हिंजवडी व खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यात पोलिसांनी गजाच्या मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या काही कोटी रुपयांच्या आलिशान मोटारी, मोबाईल व ड्रोन जप्त केलेला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com