शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी असा साजरा केला कृषिदिन 

पूर्वी आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाची फळे नातवाला खायला मिळायची; पण आज काळ बदलला आहे. आता दोन वर्षांतच झाडाला आंबे येतात. आपल्याला आंब्याची फळे खायला मिळणार नाहीत, हे आजोबांना माहिती असायचे तरीही ते नातवांसाठी आंब्याची झाडे लावायचे.
Farmer leader Raju Shetty celebrated Agriculture Day like this
Farmer leader Raju Shetty celebrated Agriculture Day like this

पुणे : "पूर्वी आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाची फळे नातवाला खायला मिळायची; पण आज काळ बदलला आहे. आता दोन वर्षांतच झाडाला आंबे येतात. आपल्याला आंब्याची फळे खायला मिळणार नाहीत, हे आजोबांना माहिती असायचे तरीही ते नातवांसाठी आंब्याची झाडे लावायचे. शेतकऱ्यांनी आजवर असाच व्यापक विचार केला आहे, त्यामुळे शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे,' असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. 

कृषिक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतामध्ये 107 आंब्यांची रोपे लावून कृषी दिन साजरा केला. 

याबाबत राजू शेट्टी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हरितक्रांतीचे जनक, राज्याचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांची 107 वी जयंती आहे. त्यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. 

एक जुलै ही त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी वसंतराव नाईक यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. त्याचबरोबर दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय त्यांनी उभारून दिला. 

"वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना राबवित कापूस खरेदीतील दलाली बंद करून शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल, यासाठी प्रयत्न केले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. 

त्यांनी आपल्या 1952 ते 1979 या 27 वर्षांच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल, असे धाडसी उद्‌गार त्यांनी 1971 मध्ये पूर्णत्वास आणून दाखविले,' असे राजू शेट्टी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

नव्या मुख्य सचिवांनी सांगितली आमदार भुयार यांना जुनी आठवण 

नाशिक : प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पहिली नियुक्‍ती त्यांच्या स्मृतिपटलावर कशी कायमस्वरूपी कोरली जाते. काही दशकांनंतरही त्या नियुक्‍तीने प्रशस्त केलेल्या कारकीर्दीच्या ऋणातून उतराईचा कसा प्रयत्न केला जातो, याचे अत्यंत बोलके उदाहरण बुधवारी (ता. 1 जुलै) महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारलेले संजय कुमार यांच्या रूपाने समोर आले आहे. यातील त्यांच्या प्रशासकीय गतिमानतेचा सुखद धक्‍का अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरूड व शेंदुरजना घाट या नगरपालिकांनी अनुभवला. 

मागच्या सरकारमधील कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना पराभूत करून आमदार बनलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार व जगदीश इनामदार यांनी संजय कुमार यांचा हा अनुभव सांगितला. कुमार सध्या गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव आहेत व गृह खात्याचाही अतिरिक्‍त कार्यभार सांभाळतात.

गेल्या डिसेंबरमध्ये किसान समन्वय समितीच्या बैठकीच्या निमित्ताने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत आमदार भुयार व इनामदार दिल्लीत होते. दोघांनी मोर्शी मतदारसंघातील तीनही नगरपालिकांचा पंतप्रधान आवास योजनेच्या चौथ्या टप्प्याचा निधी मिळावा; म्हणून संबंधित संचालकांची भेट घेतली. त्यानंतर कुमार यांच्या नावाचे पत्र तीन आठवड्यांत संचालकांकडून प्राप्त झाले. ते घेऊन गेल्या 9 जानेवारी रोजी दोघे कुमार यांना भेटले. त्यांनी लगेच म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांना फोन लावला आणि तत्काळ निधी मंजूर करा, या आमदारांनी आपल्याला कार्यालयात घेराव घातला आहे, असे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com