माजी खासदार धनंजय महाडिकांवर गुन्हा; मुलाचा विवाह सोहळा भोवला

धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यात कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Case registered against former MP Dhananjay Mahadik & two others for violation of COVID 19 measures
Case registered against former MP Dhananjay Mahadik & two others for violation of COVID 19 measures

पुणे : माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यात कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाडिक यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी राज्य शासनाने तयार नियमावलीचे उल्लंघन या विवाह सोहळ्यात झाले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये रात्री ११ वाजल्यापासून संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्येही २०० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. 

कोल्हापूर येथील भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह २१ फेब्रुवारीला पुण्यात मोठ्या थाटात झाला. या सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. विवाहात उपस्थितींच्या संख्येची मर्यादा पाळण्यात आली नाही. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन झाले नाही. अनेकांनी मास्कही घातले नव्हते. या विवाहचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न उपस्थित उपस्थित करण्यात येत होता.

अखेर हडपसर पोलिसांनी धनंजय महाडिक यांच्यासह लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि व्यवस्थापक निरुपल केदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या विवाहाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, केंद्रीय मंत्री रामदार आठवले, खासदार सजंय राऊत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com