लांब थांबा...कोरोनाचे नियम पाळा : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले

तुम्हाला बोलले तर राग येतो....
Ajit Pawar was angry at the NCP office bearers who crowded for the reception
Ajit Pawar was angry at the NCP office bearers who crowded for the reception

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुक्रवारी (ता. २८ मे) सायंकाळी सात वाजता सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाच्या ठिकाणी आगमन झाले. अनेकजण त्यांच्या स्वागताला पुढे आले. मात्र, ‘चला लांब.. लांब..!,' असे सांगत त्यांनी स्वागतासाठी पुढे आलेल्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तुम्हाला बोलले तर राग येतो, परिस्थिती काय आहे. कोरोनात नियम पाळत चला. हे बरोबर नाही, असेही त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या पदधिकाऱ्यांना फटकारले. (Ajit Pawar was angry at the NCP office bearers who crowded for the reception)

सातारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी स्वतः साताऱ्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, अधिकारी त्यांच्या स्वागताला पुढे आले होते. त्यांच्या हातात पुष्पगुच्छ होते. ते स्वागताला आलेले पाहून अजित पवार चांगलेच संतापले.

सातारा जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करतो. त्यामुळे आमचे साताराकडे विशेष लक्ष आहे. आता परिस्थिती काय आहे आणि तुम्ही नियम पाळत नाही. आम्ही तुम्हाला सारखे-सारखे नियम पाळायला सांगायचे का..?, असा सवाल करत त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फटकारण्यास सुरुवात केली. तुमचे सत्कार, पुष्पगुच्छ स्वीकारले नाही, तर राग येतो. बोलले तर राग येतो. परिस्थिती काय आहे, हे समजून घेत चला. कोरोनात कोणीही नियम पाळत नाही. त्यामुळे नियम पाळत चला, असे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बजावले.

हेही वाचा : वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या संतोष वारेंनी जपला कोरोना रुग्णसेवेचा वसा 

करमाळा (जि. सोलापूर) : आई-वडील, लहान भाऊ आणि स्वतःचाही कोरोनाशी लढा सुरू असतो... त्याच वेळी ते ठरवतात की समाजातील गोरगरिब कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करायचं....वडील नगरमधील रुग्णालयात कोरोनामुळे शेवटच्या घटका मोजत होते....पण त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतः कोरोनातून बरे झाल्यानंतर स्वखर्चाने पोथरे (ता. करमाळा) येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले....मात्र, कोरोनाशी झुंजणाऱ्या वडिलांचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला...समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले... त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून ते कोविड सेंटरमध्ये हजेरी लावून रुग्णसेवा सुरू करतात.  

ही कहाणी कोणा आमदाराची नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष आणि करमाळा बाजार समितीचे संचालक संतोष वारे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या तरुणाची आहे. संतोष वारे यांना स्वतः बरोबरच आई-वडिल आणि लहान भावालाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनातून बरे झाल्याने त्यांनी कोविड सेंटर सुरू केले. त्याचे उद॒घाटन महाराष्ट्रात आदर्श कोविड सेंटर चालविणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे वारे यांचे वडिल नगरमधील रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. दुर्दैवाने त्यांचा लढा अपयशी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. रुग्णसेवेचा वसा हाती घेतलेल्या संतोष वारे यांनी वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून अंत्यसंस्कारानंतर रुग्णसेवेला वाहून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com