‘जरंडेश्वर’वरील कारवाई ही तर सुरुवात : चंद्रकांत पाटलांचा इशारा  - Action on Jarandeshwar Sugar Factory is just the beginning : Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

‘जरंडेश्वर’वरील कारवाई ही तर सुरुवात : चंद्रकांत पाटलांचा इशारा 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे.

पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सूतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना दिला. (Action on Jarandeshwar Sugar Factory is just the beginning : Chandrakant Patil)

पाटील म्हणाले, ‘‘राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त करायचे. नंतर त्यांचा लिलाव करायचा आणि दोनशे कोटीची संपत्ती पंधरा कोटीत खरेदी करायची. त्यावर पुन्हा तीनशे कोटीचे कर्ज घ्यायचे, अशा पद्धतीचा गैरव्यवहार राज्यात झाला आहे. अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत. जरंडेश्वर हे या गैरव्यवहाराच्या बाबतीत हिमनगाचे टोक आहे. यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत.’’

हेही वाचा : शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना फडणवीसांची फूस : हसन मुश्रीफ  

सहकारी साखर कारखान्यांची शेकडो कोटींची संपत्ती कवडीमोलाने हडपण्याच्या प्रकाराची चौकशी होण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राजकीय दबावासाठी कारवाई केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी नाकारला. ते म्हणाले की, ‘‘कारवाईबद्दल तक्रार करणाऱ्यांनी आधी काही गैरव्यवहार झाला हे तरी मान्य करावे. सध्याच्या काळात चूक करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख