सावकारकीच्या पैशातून तरुणाला पेट्रोल ओतून जिवंत जाळले

शिवराजला १३ दिवस अज्ञातस्थळी एका खोलीत डांबून ठेवले.
young man was burnt alive by pouring petrol from the interest money
young man was burnt alive by pouring petrol from the interest money

इंदापूर (जि. पुणे ) : बेकायदा सावकारकीच्या पैशातून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शिवराज ऊर्फ शिवराम कांतिलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) याचे अपहरण करुन त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जंक्शन (ता. इंदापूर) फॉरेस्ट हद्दीत जिवंत जाळण्यात आले. (young man was burnt alive by pouring petrol from the interest money)

या प्रकरणी नवनाथ हनुमंत राऊत (वय ३२, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) व सोमनाथ भीमराव जळक (वय ३१, रा. इंदापूर) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवराज हेगडे हा ता. ७ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास निमगाव केतकी येथील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या संशयित आरोपींनी त्याला पाठीमागून बंदूक लावून चारचाकी वाहनातून त्याचे अपहरण केले. तुझ्याकडे आणखी पैसे निघतात, असे म्हणून १३ दिवस अज्ञातस्थळी एका खोलीत डांबून ठेवले. 

शिवराज हेगडे याला २० जून रोजी सकाळी ६ वाजता जंक्शन फॉरेस्ट हद्दीत आणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून, जिवंत पेटवून देवून आरोपी पसार झाले. शिवराजला नागरिक, तसेच नातेवाइकांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात  भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे पोलिसांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदवला. मात्र, शिवराज हा ९५ टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी जबाबानुसार राऊत व जळक यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

संशयित आरोपींना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती पोलिस उपनिरिक्षक संजय धोत्रे यांनी दिली. मृत शिवराज हेगडे व आरोपी सोमनाथ जळक हे चांगले मित्र होते. तसेच ते सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आले होते. मात्र, शेवटी पैशावरून दोघांत वितुष्ट येऊन त्याची परिणती हेगडे याच्या मृत्यूमध्ये झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com