राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा महिलेचा आरोप 

परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर यांनी लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप परभणी येथील एका महिलेने केला आहे. पिडीतेसह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांची, आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात हा आरोप करण्यात आला.
  Rajesh Vitekar .jpg
Rajesh Vitekar .jpg

पुणे : परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर यांनी लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने माझ्यावर बलात्कार (Rape) केला, असा आरोप परभणी येथील एका महिलेने केला आहे. पिडीतेसह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांची, आज पुणे( Pune) येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात हा आरोप करण्यात आला. Women Accused NCP leader Rajesh Vitekar for sexual harassment

नोकरी मिळवून देतो म्हणून माझ्यावर लैगिंक अत्याचार केला. मला धमकावले, तुला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, असी धमकी देण्यात आली. मी सोनपेठ पोलिस स्टेशनला गेल्यानंतर माझा गुन्हा नोंदवला गेला नाही. पोलिस स्टेशन आणि गृहमंत्री सगळ्यांकडे गेले आहे. माझ्यावरच खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहेत, असे या महिलेचे म्हणणे आहे.

पोलिस स्टेशनमधून (Police Station) मला हकलून दिले. मी एक शिक्षिका (Teacher) आहे. माझ्या परिवाराला त्रास दिला जात आहे. सत्ताधारी पक्ष असे करत असतील तर काय करणार? पंन्नसपेक्षा जास्त अर्ज मी केले आहेत. विटेकर यांच्या दहशतीमुळे मला घरीसुद्धा राहू दिले जात नाहीत, असे आरोप या महिलेने केले आहेत. 

राज्यात पिडितेला न्याय का मिळत नाही, असा सवाल देसाई यांनी केला, राजकारण्यांना आणि इतर माणसांना वेगळा न्याय का ? राजेश विटेकर आणि त्यांच्या इतर साथिदारांवर गुन्हा दाखल झाला नाही, तर परभणीत जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला.   Women Accused NCP leader Rajesh Vitekar for sexual harassment

माझ्यावर अॅट्राॅसिटीचा खोटा गुन्हा दाख केला. तीन दिवस आम्हाला अटकेत ठेवण्यात आले. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला. मला पण एक दिवस आत्महत्या करावी लागेल, असा इशारा पिडितेने दिला. मी गेल्या एक वर्षापासून अर्ज करत आहे. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik), माजी मंत्री फौजिया खान (Foujia Khan) हे विटेकरांना पाठिशी घालत आहेत, असा आरोप पिडितेने केला आहे. विटेकर यांनी या आधी एका मुलीचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी देसाई यांनी केली.  

दरम्यान, या आरोपांबाबत विटेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू सविस्तर पणे देण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com