आमदार संग्राम थोपटे विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळणार का? 

त्यावेळी आमदार थोपटे व कॉंग्रेसच्याच पंचायत समिती सदस्यांमध्ये अंतर्गत कलह झाल्याची चर्चा रंगली होती.
Will MLA Sangram Thopte keep his word given to NCP during assembly elections?
Will MLA Sangram Thopte keep his word given to NCP during assembly elections?

वेल्हे (जि. पुणे) : वेल्हे पंचायत समितीच्या उपसभापतिपदाची निवड उद्या (शुक्रवारी, ता. 22 जानेवारी) होणार आहे. उपसभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनंत दारवटकर यांना संधी मिळणार की, परत कॉंग्रेस सदस्याच्याच गळ्यात माळ पडणार, याची तालुक्‍यात चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात आलेला शब्द कॉंग्रेसकडून या वेळी तरी पाळला जाणार का? असा प्रश्‍न आहे. 

विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला सभापतिपद देण्याचा शब्द वेल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांना दिला होता. पण, आमदार थोपटे यांचा आदेश झुगारत कॉंग्रेसच्या सदस्यांनी वर्षभरापूर्वी आपल्याच पक्षाचा सदस्य सभापतिपदी बसविला होता. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

वेल्हे पंचायत समितीमध्ये उद्या (ता. 22 जानेवारी) उपसभापतिपदाची निवड भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. चार सदस्य असलेल्या वेल्हे पंचायत समितीवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून कॉंग्रेसचे तीन सदस्य आहेत. यामध्ये दिनकर सरपाले, सीमा राऊत, संगीता जेधे यांचा समावेश आहे. तर, राष्ट्रवादीचे अनंता दारवटकर हे एकमेव सदस्य आहेत. 

कॉंग्रेसने संख्याबळामुळे पहिल्या सव्वा वर्षासाठी सभापतिपदी सीमा राऊत, उपसभापतिपदी दिनकर सरपाले यांची बिनविरोध 
निवड केली होती. नंतरच्या सव्वा वर्षासाठी संगीता जेधे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली; तर उपसभापतिपदी दिनकर सरपाले हे कायम होते. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी वेल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रेवणनाथ दारवटकर यांनी आमदार संग्राम थोपटे यांना मदत केली होती. त्याबदल्यात दारवटकर यांचे चिंरजीव अनंता दारवटकर यांना वेल्ह्याचे सभापतिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, वेल्हे पंचायत समितीतील सदस्यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या सभापती निवडीत आमदार थोपटे यांचा आदेश डावलत कॉंग्रेसचेच दिनकर सरपाले यांना सभापतिपदी विराजमान केले होते, तर उपसभापतिपदी सीमा राऊत यांची निवड केली होती. त्यावेळी आमदार थोपटे व कॉंग्रेसच्याच पंचायत समिती सदस्यांमध्ये अंतर्गत कलह झाल्याची चर्चा रंगली होती.

मधल्या काळात सभापतींना राजीनामा देण्याचीही सूचना केली होती. मात्र, सभापतीऐवजी उपसभापतींचा राजीनामा घेत तीही सूचना सदस्यांनी अव्हेरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

ठरलेला कालावधी संपल्यानंतर सीमा राऊत यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उपसभापतिपदाची माळ दारवटकर यांच्या गळ्यात पडणार, की आमदार थोपटे यांचा शब्द डावलत पुन्हा उपसभापतिपदी कॉंग्रेसच्या एखाद्या सदस्याला विराजमान करणार, याची उत्सुकता तालुक्‍यात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com