खेड तालुक्याची जबाबदारी मी स्वतः पाहणार : शिवाजीराव आढळराव पाटील - Will Look into Khed Tehsil Issues say Shivsena EX MP Shivajirao Adhalrao | Politics Marathi News - Sarkarnama

खेड तालुक्याची जबाबदारी मी स्वतः पाहणार : शिवाजीराव आढळराव पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

खेड तालुक्याची जबाबदारी यापुढे मी स्वतः पाहणार आहे.तालुक्यातील निवडणूका,कार्यकर्त्यांची कामे याकडे लक्ष देणार आहे.कार्यकर्त्यांनी कधीही मला फोन करावा असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे सांगितले

चाकण : खेड तालुक्याची जबाबदारी यापुढे मी स्वतः पाहणार आहे.तालुक्यातील निवडणूका,कार्यकर्त्यांची कामे याकडे लक्ष देणार आहे.कार्यकर्त्यांनी कधीही मला फोन करावा असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे सांगितले.

चाकण, ता,खेड येथे खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी खासदार आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, "जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही विकासाची कामे सांगा ती करून घ्या. स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे आणि माझ्यात कधीच वाद झाले नाहीत.मुख्यमंत्र्यांनी सांगितले कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवा, त्यांची मते जाणून घ्या. खेड-आळंदी मध्ये मी सर्वाधिक लक्ष देणार आहे. स्वर्गीय माजी आमदार गोरेंचे विचार घेऊन पुढे जाणार आहे. खेड पंचायत समितीची इमारत ज्या ठिकाणी भूमीपूजन झाले आहे त्याच ठिकाणी उभारणार आहे .त्यात कोणीही राजकारण करू नये,''

यापुढील चाकण नगरपरिषदेची निवडणूक जिंकायची आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा एकही मंत्री भेट दयायला आला नाही. खंडीभर मंत्री असून कोणी भेटायला आले नाही ही खंत आहे,'' असेही आढळराव यावेळी म्हणाले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माऊली कटके, इरफानभाई सय्यद, अशोक खांडेभराड,किरण मांजरे,भगवान पोखरकर, बाबाजी काळे, राजू जवळेकर,रामदास धनवटे,ज्योती अरगडे,स्नेहा जगताप,प्रकाश गोरे ,विजय शिंदे आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी विजया शिंदे,अमर कांबळे,लक्ष्मण जाधव,प्रकाश वाडेकर, राहुल गोरे ,सुरेश भोर, राजेंद्र गोरे,ज्ञानेश्वर कड,विजया जाधव,उर्मिला सांडभोर,पांडुरंग गोरे,बिपीन रासकर,माणिक गोरे ,महेश शेवकरी,आदी व इतर कार्यकर्ते, महिला आदी मोठया संख्येने उपस्थित होते.आढावा बैठकीत स्वर्गीय माजी आमदार गोरे यांच्या अकाली निधनाबद्दल विचार व्यक्त करून त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख