खासदार अमोल कोल्हेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडले पहिले पाऊल!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.
Water Resources Department will get land for Shiv Sanskar Shrishti project in Junnar
Water Resources Department will get land for Shiv Sanskar Shrishti project in Junnar

जुन्नर (जि. पुणे) : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवसंस्कार सृष्टी' साकारण्याचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठीचे पहिले पाऊल पडले आहे. कारण, जुन्नर तालुक्यातील जलसंपदा विभागाची जागा शिवसंस्कार सृष्टीसाठी देण्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जयंत पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. (Water Resources Department will get land for Shiv Sanskar Shrishti project in Junnar)

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात 'शिवसंस्कार सृष्टी' व्हावी, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पासाठी जागा मिळाल्यास निधी उपलब्ध करून देण्याची तयारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली होती. डॉ. अमोल कोल्हे यांनी जलसंपदा विभागाच्या मालकीची जागा सुचवली होती. त्यानुसार त्यांचा जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार सुरू होता. त्या संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. ३ जून) मंत्रालयात बैठक पार पडली. 

या वेळी आमदार अतुल बेनके, जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, पर्यटन सचिव व्हल्सा नायर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत साकारण्यात येणाऱ्या 'शिवसंस्कार सृष्टी'साठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले. 

जुन्नरच्या लौकिकात भर घालणारा प्रकल्प  : डॉ. कोल्हे 

जुन्नर हा पर्यटन तालुका जाहीर झाला आहे. मात्र, पर्यटन वाढीच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार असून तालुक्यात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्याने आपण हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जुन्नरच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प असल्याने त्याच्या उभारणीसाठी आमदार बेनके व आपण समन्वयाने पाठपुरावा करणार आहोत, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com