यवत परिसरात उत्साहात मतदान सुरू

यवत गावात तेरा आणि यवत स्टेशनला दोन आशा पंधरा मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रीयेस सुरूवात झाली. सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस टक्के मतदान झाले होते.
Yavat Voting
Yavat Voting

यवत : यवत परिसरातील भांडगाव, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, कासुर्डी परिसरात ग्रामपंचायत मतदानास शांततेत सुरूवात झाली. सकाळपासून मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पहावयास मिळाला. कार्यकर्त्यांची लगबग आणि उमेदवारांची घालमेल या पार्श्वभूमीवर मतदारांचा प्रतिसाद चांगला होता. यवत व यवत स्टेशन या दोन वेगवेगळ्या महसुली गावांमध्ये मिळून सुमारे चौंदा हजार मतदार आहेत. 

यवत गावात तेरा आणि यवत स्टेशनला दोन आशा पंधरा मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रीयेस सुरूवात झाली. सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस टक्के मतदान झाले होते. मतदारांचा उत्साह पाहता मतदानाची टक्केवारी वाढण्याचे संकेत आहेत. 17 सदस्य संख्या असलेल्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 39 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात एका माजी सरपंचासह चार माजी उपसरपंचांचा समावेश आहे. 

यवत गावाला निवडणूकाळात भांडण- हाणामारीचा इतिहास असल्याने पोलीसांच्या दृष्टीने हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानले गेलेले आहे. त्यामुळे यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सुरूवाती पासूनच येथे शांतता राहिल याची खबरदारी घेतलेली आहे. त्यांनी यवतसह सहजपूर, वरवंड, पाटस या गावांमध्ये दोन दिवसांपुर्वीच आपल्य़ा फौजफाट्यासह पथसंचलन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज मतदानात शांततेत आणि उत्साहात सुरूवाती झाली आहे. दिवसभर अशीच शांतता राहण्यासाठी पोलीस काळजी घेताना दिसत होते
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com