पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत वंचित उमेदवार देणार : प्रकाश आंबेडकरांची घोषणा 

ही पोटनिवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे.
vanchit Bahujan Aghadi will field candidate in Pandharpur by-election : Prakash Ambedkar
vanchit Bahujan Aghadi will field candidate in Pandharpur by-election : Prakash Ambedkar

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरच्या पत्रकार परिषदेत केली. 

सोलापुरात शनिवारी (ता. 20 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.

"पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवारी, ता. 21 मार्च) पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीची बैठक होणार आहे. ही पोटनिवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे. मात्र, आम्ही ही पोटनिवडणूक लढवणार आहोत,' अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी या वेळी बोलताना दिली. 

आमदार भारत भालके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले हाते. त्यामुळे पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. त्याचशिवाय भारतीय जनता पक्षही आपला उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. पण, अद्याप पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. 

या दोन मोठ्या पक्षाशिवाय धनगर समाजानेही उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यशवंत सेनेच्या माध्यमातून समाजाच्या वतीने संजय माने यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. तसेच, पंढरपूर मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडवून घेण्याची मागणी करत राजून शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा दर्शविली आहे. 

दरम्यान, सोलापुरात बोलताना आंबेडकर यांनी वीज कनेक्‍शन तोडणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, वीजबिलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

विधानसभेत त्यांना घेराव घातला जाऊ नये; म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीज कनेक्‍शन तोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, शेवटी पुन्हा वीज कनेक्‍शन तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली. त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. 

बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीजबिल माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, राऊत त्यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाहीत. ते कॉंग्रेसचे दुबळे मंत्री आहेत. त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. या सर्वामध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचितचे प्रमुख आंबेडकर यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com