टोलनाके काढून घेताच उदयनराजे आक्रमक; टोल दरवाढ मागे घेण्यासाठी दिला इशारा

5 टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरात 5 टक्केपेक्षा जास्त कपात करण्याची गरज आहे.
Udayan Raje became aggressive as soon as the toll collection contract was withdrawn
Udayan Raje became aggressive as soon as the toll collection contract was withdrawn

पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोलच्या दरात सुमारे पाच टक्के केलेली दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी, नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारी आहे, अशी टीका साताऱ्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने या दोन्ही टोलनाक्याच्या वसुलीचा ठेका उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित कंपनीकडून काढून घेतला आहे. त्यानंतर उदयनराजे अधिक आक्रमक झाल्याची चर्चा रंगली आहे. 

पुणे-सातारा महामार्गाचे काम 2013 मध्येच पूर्ण होणार होते. मुळची मुदत संपूनही सुमारे 8 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही. म्हणूनच 5 टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरात 5 टक्केपेक्षा जास्त कपात करण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली.

सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. असलेले सेवा रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत का नाहीत, हेदेखिल समजत नाही. रस्त्यांवरील खड्डयांची तर मोजदादही करता येत नाहीत, इतके असंख्य खड्डे रस्त्यावर आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खरंच आहे का, असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो.

महामार्गावर दिशादर्शक-स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा अपरिचित वाहनचालकाला एखादे गाव कधी आपण मागे टाकले हेदेखिल कळत नाही. ट्रक ले-बाय, शौचालय सुविधा इत्यादी बाबी, तर सुरुवातीपासूनच गायब आहेत. शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावरून आनेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यांपेक्षा कमी टोल दर देवून, प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवासी हे सातारा-पुणे प्रवासादरम्यान प्रत्येक असुविधेबाबत आणि खड्डयांबाबत अक्षरश: लाखोली वाहत असतात.

या व अशा सारख्या अनेक सुविधांची असलेल्या वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथेंरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालवणाऱ्या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करून, प्रवासी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. तसेच, नुसती दरवाढ मागे न घेता जुन्या दरात 5 टक्यापेक्षा जास्त रक्कमेची टोल कपात करावी, अशी आग्रही मागणी नागरीक- प्रवासी आणि वाहनचालकांच्या वतीने उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com