गृहमंत्री वळसे पाटलांच्या आंबेगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह दोघांचा खून   

सचिन जाधव यांचा मृतदेहवॅगनार कारमध्ये टाकून सुमारे 60 किलोमीटरवरील कोरठणघाट घाटात खोल दरीत पेटवून दिला.
Two murders in Ambegaon taluka on the same day
Two murders in Ambegaon taluka on the same day

पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या आंबेगाव तालुक्यात (Ambegaon taluka) एकाच दिवशी दोन खून (Two murders) झाले आहेत. त्यातील एक खून तर वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा झाला असून दुसरा खून हा महिलेचा झालेला आहे. या दोन खुनामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Two murders in Ambegaon taluka on the same day)

आंबेगाव तालुक्यातील पारगाव- अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन राजाराम जाधव ( वय 42, रा. धामणी ता. आंबेगाव) यांचा व्यवसायातील पैशाच्या देवाण घेवाणीतून निर्घुण खून झाला आहे. पोलिसांनी शिताफिने तपास करत अवघ्या चार तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य सुत्रधार त्यांच्या व्यवसायातील भागीदार निघाला आहे.

सचिन जाधव हे मंगळवारी (ता. 25 मे) सायंकाळी सात वाजता घरातून चारचाकी गाडीतून बाहेर गेले होते, ते पुन्हा घरी आले नव्हते. त्यांचा मोबाईलही बंद होता. आज (ता. २६ मे) सकाळी पोंदेवाडीफाटा (ता. आंबेगाव) जवळ काठापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रक्ताचे मोठे डाग पडले होते, त्या ठिकाणी गाडीच्या टायरचे निशाणी दिसली. तसेच, त्या ठिकाणी चप्पल, कंगवा सापडला. त्याठिकाणी गर्दी जमा झाली होती. पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी चप्पल व कंगवा सचिन जाधव यांचा असल्याचे ओळखल्याने काहीतरी घातपात घडल्याचा संशय बळावला. 

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्यानंतर खेड विभागाचे उपविभागीय पोलिस आधिकारी अनिल लंबाते, पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी वेगाने तपास करत दोन तासांत संशयित आरोपीपर्यंत पोचले. एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यापैकी मुख्य सुत्रधार बाळशिराम थिटे (रा. धामणी ता. आंबेगाव) व विजय सूर्यवंशी ( रा. जुन्नर तालुका) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चार तासांत तपास करत या गुन्ह्याचा शोध लावला. 

सचिन जाधव यांचा पोंदेवाडीफाट्याजवळ तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करुन खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने सचिन जाधव यांचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या वॅगनार कारमध्ये टाकून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील कोरठणघाट (ता. पारनेर जि. नगर) घाटात खोल दरीत मृतदेह पेटवून दिला, तर सचिन जाधव यांची वॅगनार कार मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर आरोपींनी पेटवून दिली होती. ती कार पूर्णपणे जळुन खाक झाली होती.

सचिन जाधव व बाळशिराम थिटे व्यवसायिक भागीदार होते, त्यांनी एकत्रीत बेकरी सुरु केली होती. सचिन जाधवांना बाळशिराम थिटे यांच्याकडुन मोठी रक्कम येणे होती अशी चर्चा सध्या सुरु आहे. 

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली होती. मूळच्या नगर जिल्ह्यातील द्रौपदाबाई या थोरांदळे गावात सध्या वास्तव्यास होत्या. मोलमोजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करायच्या. त्यांना मंगळवारी रात्री एक फोन आला आणि त्या घराबाहेर पडल्या. त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com