दौंडच्या कुसेगावात मतदान केंद्रावरच दोन गटांत धक्काबुक्की 

गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
Two groups clashed at the polling station in Kusegaon of Daund
Two groups clashed at the polling station in Kusegaon of Daund

पाटस (जि. पुणे) : दौंड तालुक्‍यातील कुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत एक उमेदवार मतदान केंद्राबाहेर थांबून मतदारांना चिन्ह सांगत असल्याच्या संशयावरून दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (ता. 15 जानेवारी) सकाळी बाचाबाची आणि धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. 

कुसेगाव ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी 3 अपक्षांसह एकुण 21 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रावर गर्दी केली होती. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना केंद्रावर घेऊन येण्यासाठी लगबग सुरु होती.

मतदान शांततेत सुरू असताना सकाळी दहाच्या सुमारास एक उमेदवार केंद्राबाहेर थांबून मतदारांना चिन्ह सांगत असल्याचा आक्षेप विरोधी गटातील पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी घेतला. 

याच मुद्यावरुन दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली. बाचाबाची होत असल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. 

पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनीही दुपारी कुसेगाव मतदान केंद्र परिसरात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दिवसभर मतदार केंद्रावर तणावपूर्ण शांतता होती. 

याबाबत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले, "किरकोळ कारणावरुन दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये केवळ बाचाबाचीचा प्रकार घडला आहे. याबाबत दोन्ही गटाकडून कसलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com