मुलांचे लग्न धूमधडाक्यात करणे झेडपीच्या माजी अध्यक्षांना भोवले; २४ तासांत दोन गुन्हे दाखल  

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन भोवले.
  Devram Lande .jpg
Devram Lande .jpg

पुणे : कोरोना काळात मोठा विवाह सोहळा साजरा करणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम लांडे (Devram Lande) यांना भोवले आहे. सोहळ्यास मोठी गर्दी केल्याच्या कारणावरून लांडे यांच्यासह जुन्नर येथील मंगल कार्यालयाचे मालक तसेच व्याही अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जून्नर पोलीसांनी आपत्ती प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला. (Two cases have been registered against Devram Lande) 

त्यापाठोपाठ संध्याकाळी केवाडी ता. जुन्नर गावामध्ये वरातीसाठी ५०० ते ७०० लोकांचा जमाव जमवुन डीजे वाजवल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार गणेश बाळूजोरी यांनी दिली. त्यामुळे डीजे मालक व देवराम लांडे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झल्यामुळे देवराम लांडे यांच्या विरोधात २४ तासात सलग दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केले, जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश न  जुमानता स्वतःच्या दोन मुलांच्या लग्न सोहळ्यासाठी १८०० ते २००० लोक एकत्र केले असल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली. यामुळे मंगल कार्यालय मालक केदारी, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, दोन व्याही यांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. 

केवाडीमध्ये वरातीसाठी देखील लोकांचा जमाव जमवून सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध न जुमानता डिजे वाजवल्या बद्दल डिजे मालक व लांडे यांच्यावर आपत्ती प्रतिबंधक कायदयान्वये २४ तासांत दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम लांडे, एकनाथ कोरडे, चैतन्य मिंडे, सुधीर घीगे तसेच क्षितीज कडने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे पोलिस निरिक्षक विकास जाधव यांनी दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com