तुपे-धुमाळ-कुंजीर गटाने राखली सलग चौथ्यांदा सत्ता 

दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
Tupe-Dhumal-Kunjir group power in Kunjirwadi gram panchayat for fourth time
Tupe-Dhumal-Kunjir group power in Kunjirwadi gram panchayat for fourth time

लोणी काळभोर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायतीवर श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे व माजी सरपंच संतोष कुंजीर-पाटील यांच्या गटाने सलग चौथ्यांदा सत्ता राखली आहे. सचिन तुपे, संदीप धुमाळ व संतोष कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलने सतरापैकी नऊ जागा पटकावून सलग चौथ्यांदा सत्ता राखली आहे. 

माजी उपसरपंच भारत निगडे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीने तीन, तर युवा नेते संग्राम कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीने तीन जिंकल्या आहेत. तर उर्वरीत तीन जागांपैकी एक जागा शिवसेनेच्या पारड्यात गेली आहे. तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत. 

संदीप धुमाळ, सचिन तुपे, संतोष कुंजीर, सुनीता धुमाळ यांच्या गटाच्या ताब्यात मागील पंधरा वर्षांपासून सत्ता आहे. ग्रामपंचायतीच्या सतरा जागांपैकी एक महिला सदस्य बिनविरोध निवडून आल्याने उर्वरीत सोळा जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलने सतरापैकी आठ जागा पटकावल्या. 

बिनविरोध निवडून आलेली महिलाही श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलची समर्थक आहे. यामुळे श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेलच्या निवडून आलेल्या सदस्यांची संख्या नऊवर पोचली आहे. शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर व सुरेश कुंजीर यांच्या गटाला एक जागा मिळाली. तर युवा नेते संग्राम मच्छिंद्र कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक आघाडीने तीन जागा जिंकल्या आहेत. 

निवडून आलेले प्रभागनिहाय उमेदवार (कंसात पॅनेलचे नाव) :  प्रभाग 1- आशा किसन कुंजीर, चंद्रकांत बबन मेमाणे, सुरेखा दत्तात्रेय गाढवे (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल). प्रभाग 2- दीपक अनंता ताम्हाणे, अर्चना संदीप धुमाळ, अजय निवृत्ती कुंजीर (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल). प्रभाग 3- गोकुळ निवृत्ती ताम्हाणे, कैलास प्रमोद तुपे (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल). प्रभाग 4- अंजू गुलाब गायकवाड, लता अनिल कुदळे, सागर यशवंत निगडे. 

माजी उपसरपंच भारत निगडे यांची आघाडी 
प्रभाग 5- सारिका गिरीष भोंगळे, अलका संतोष कुंजीर, संग्राम मच्छिंद्र कोतवाल (युवा नेते संग्राम कोतवाल आघाडी). 
प्रभाग 6- हरेश श्‍यामराव गोठे (अपक्ष), साधना नाना कुंजीर (श्रीनाथ काळभैरवनाथ पॅनेल) व सुमन वसंत कुंजीर (शिवसेना). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com